दिलासादायक! पिंपरी चिंचवडमधील 3 कोरोनाग्रस्तांवर 14 दिवसांचे उपचार पूर्ण, प्रकृती स्थिर

दिलासादायक! पिंपरी चिंचवडमधील 3 कोरोनाग्रस्तांवर 14 दिवसांचे उपचार पूर्ण, प्रकृती स्थिर

पहिल्या 3 कोरोना बाधितांवर आज उपचाराचे 14 दिवस पूर्ण झाले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अनिल रॉय यांनी दिली आहे.

  • Share this:

पिंपरी चिंचवड, 23 मार्च : पिंपरी चिंचवड शहरात आढळेल्या पहिल्या 3 कोरोना (coronavirus) बाधितांवर आज उपचाराचे 14 दिवस पूर्ण झाले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अनिल रॉय यांनी दिली आहे. आज पुन्हा एकदा त्यांच्या घशातील द्रव्यांचे नमुने तपासणी पाठवले जाणार असून त्या बाबतचे रिपोर्ट निगेटिव्ह येतील अशी अपेक्षा आहे असंही रॉय म्हणाले.

कोरोनाबधित रुग्णांची ही प्रकृती स्थिर आहे, ही जरी दिलासादायक बाब असली तरीही पिंपरी चिंचवडमध्ये आतापर्यंत तब्बल 900 पेक्षा अधिक लोकांना कॉरन्टाईन केलं गेलं आहे. मात्र त्यातील अनेकजण बाहेर फिरत असून अशा 12 व्यक्तींविरोधात पोलिसांना कळविण्यात आले आहे.

ही परिस्थिती पुन्हा उद्भवू नये यासाठी आज पासून कॉरन्टाईन केल्या गेलेल्या व्यक्तीच्या हातावर शिक्का मारण्याची मोहीम सुरू करण्यात आली असून त्यांना घरीच बसून स्वतःची काळजी घेण्याबरोबरच आपल्याला ताप येतो का ह्याची वेळो वेळा तपासणी करण्या बाबत सक्त सूचना देण्यात आल्याचंही रॉय यांनी सांगितलं आहे.

राज्यात एका दिवसात 15 नवे रुग्ण

एकीकडे पिंपरी चिंचवडमधील 3 कोरोनाबाधित रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची दिलासादायक बातमी आलेली असताना दुसरीकडे एक चिंताजनक आकडेवारी समोर आली आहे. महाराष्ट्रात 24 तासांत तब्बल 15 रुग्ण वाढले आहेत. महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 89 वर पोहोचली आहे. मागच्या दोन दिवसांमध्ये महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वेगान वाढ होत असल्यानं चिंता व्यक्त केली जात आहे. भारतात आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झाला तर कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 396 वर पोहोचली आहे. दरम्यान गेल्या 24 तासांत देशभरात 80 हून अधिक नवीन रुग्ण आढळले आहेत.

First published: March 23, 2020, 11:39 AM IST

ताज्या बातम्या