मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

कोव्हिड रुग्णालयाच्या परिसरातच विषारी नागाचा प्रवेश, नागरिकांमध्ये खळबळ; पाहा VIDEO

कोव्हिड रुग्णालयाच्या परिसरातच विषारी नागाचा प्रवेश, नागरिकांमध्ये खळबळ; पाहा VIDEO

पिंपरीतील यमुना नगर परिसरात असलेल्या रुग्णालयातील हा प्रकार आहे.

पिंपरीतील यमुना नगर परिसरात असलेल्या रुग्णालयातील हा प्रकार आहे.

पिंपरीतील यमुना नगर परिसरात असलेल्या रुग्णालयातील हा प्रकार आहे.

पिंपरी-चिंचवड, 20 जुलै : रुग्णालयाच्या परिसरात एका विषारी नागाने प्रवेश केल्यामुळे तेथील रुग्णांच्या नातेवाईकांची एकच तारांबळ उडाल्याची घटना आज पिंपरी चिंचवडमध्ये घडली आहे. पिंपरीतील यमुना नगर परिसरात असलेल्या रुग्णालयातील हा प्रकार आहे. रुग्णालयाच्या परिसरात फिरणाऱ्या एका नागरिकाच्या लक्षात ही बाब आली आणि त्यांनी तात्काळ सर्पमित्राला पाचारण केले. सर्प मित्र राजू कदम याने काही वेळातच या नागाला जेरबंद केलं आणि कोरोनाच्या पाठोपाठ रुग्णांवर आलेलं हे संकट दूर झाल्याची चर्चा करत सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. कोव्हिड रुग्णालय परिसरात पकडलेल्या या नागाला मानवी वस्तीपासून दूर असलेल्या वन क्षेत्रात सोडून देण्यात आलं आहे. रुग्णालय परिसरात दाट गवत वाढलेले असल्याने तिथे या सापाचं, वास्तव्य असावं अशी शक्यता सर्पमित्र राजू कदम यांनी वर्तवली आहे. दरम्यान, पावसाला सुरुवात झाल्यावर गेल्या काही दिवसांपासून मानवी वस्तीत नाग आढळल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत.
Published by:Akshay Shitole
First published:

Tags: Pimpari chinchawad

पुढील बातम्या