ऐन तारुण्यात काळाचा घाला; पिंपरी चिंचवडमध्ये अपघातात तरुणाने गमावला जीव, एक गंभीर

ऐन तारुण्यात काळाचा घाला; पिंपरी चिंचवडमध्ये अपघातात तरुणाने गमावला जीव, एक गंभीर

दुचाकीवरून जाणाऱ्या दोन तरुणांपैकी एकाचा जागीच मृत्यू झाला.

  • Share this:

पिंपरी चिंचवड, 27 नोव्हेंबर : भरधाव वेगात जाणाऱ्या एका डंपरने दुचाकीला धडक दिल्याने भीषण अपघात झाला आहे. दुचाकीवरून जाणाऱ्या दोन तरुणांपैकी एकाचा जागीच मृत्यू झाला, तर एकजण गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना पिंपरी चिंचवड परिसरात घडली आहे. सायंकाळी 5 च्या वाजताच्या सुमारास घडलेल्या या अपघातात सनी नावाच्या तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे, तर स्वप्नील बंगले असे गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, सनी आणि स्वप्नील भोसरीकडून पिंपळे सौदागरच्या दिशेने दुचाकीवरून जात होते. कासारवाडी येथील नाशिक फाटा जवळ आल्यानंतर त्यांच्या दुचाकीला एका डंपरने धडक दिली. त्यात सनीचा जागीच मृत्यू झाला तर स्वप्नील गंभीर जखमी झाला.

प्रत्यक्षदर्शी महादेव कदम म्हणाले, "मी माझ्या कामासाठी नाशिक फाट्याकडून पिंपळे सौदागरच्या दिशेने जात होतो. नाशिक फाट्याजवळ हा अपघात पाहिला आणि थांबलो. पोलिसांच्या मदतीसाठी 100, 198 या क्रमांकावर वारंवार फोन केले. मात्र कोणी फोन उचललाच नाही. बराच वेळ पोलीस मदतीच्या प्रतीक्षेत थांबल्यानंतर दोन-तीन नागरिकांच्या मदतीने जखमी स्वप्नीलला माझ्या कारमधून पिंपरीमधील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात आणले आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत."

भोसरीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे म्हणाले, "नाशिक फाट्याजवळ अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे. पोलिसांना घटनास्थळी पाठवले आहे. पुढील कारवाई सुरू आहे."

अडचणीत असताना पोलिसांच्या मदतीची आवश्यकता असते. मात्र नेमकं अडचणीच्या वेळी पोलीस साधा फोनही उचलत नाहीत, असा नागरिकांचा आरोप आहे. आजच्या अपघातानंतरही जखमी तरुणाला पोलिसांच्या मदतीसाठी बराच वेळ रस्त्यावर पडून राहावं लागल्याचं पाहायला मिळालं. सध्या जखमीवर उपचार सुरू असून पोलीस डंपर चालकाचा शोध घेत असल्याची माहिती मिळत आहे.

Published by: Akshay Shitole
First published: November 27, 2020, 7:20 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading