अजित पवारांनंतर समर्थकही आक्रमक, पिंपरी चिंचवडमधून पहिला राजीनामा

अजित पवारांनंतर समर्थकही आक्रमक, पिंपरी चिंचवडमधून पहिला राजीनामा

अजित पवार यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी त्यांच्या समर्थकांनीही राजीनामा देण्यास सुरुवात केली आहे.

  • Share this:

गोविंद वाकडे, पिंपरी चिंचवड, 28 सप्टेंबर : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला. त्यानंतर अजित पवार यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी त्यांच्या समर्थकांनीही राजीनामा देण्यास सुरुवात केली आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील राष्ट्रवादीचे नगरसेवक जावेद शेख यांनी पदाचा राजीनामा दिला.

'सत्ताधाऱ्यांकडून सुरू असलेल्या सूडाच्या राजकारणाला कंटाळून आपण राजीनामा देत आहोत,' असं जावेद शेख यांनी म्हटलं आहे. शेख यांनी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला आहे. त्यामुळे आता अजित पवारांचं समर्थन करण्यासाठी पक्षातील इतर नेते राजीनामा देण्यासाठी पुढे येत असल्याचं दिसत आहे.

अजित पवारांच्या राजीनाम्यावर काय म्हणाले शरद पवार?

अजित पवारांच्या तडकाफडकी राजीनाम्यानंतर पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी याबाबत खुलासा केला. 'आज दुपारी बैठका सुरू असताना राष्ट्रवादीचे विधिमंडळ नेते अजित पवार यांनी राजीनामा दिला. त्यांनी आमच्या कुणाशीही चर्चा केली नव्हती. मी त्यांच्या कुटुंबाशी संपर्क केला तर त्यांनी दिलेलं कारण समजलं. शिखर बँक घोटाळ्या प्रकरणी माझ्या नावाचा समावेश करण्यात आला. त्यामुळे अजित पवार हे अस्वस्थ होते. राज्यातील राजकारणाची पातळी खालावली आहे. यातून बाहेर पडावं असा सल्लाही त्यांनी आपल्या मुलाला दिला होता,' असं शरद पवारांनी सांगितलं. माझ्यावर गुन्हा दाखल झाल्यामुळे अजित पवार नाराज झाले होते. त्यांच्याशी संपर्क झाल्यानंतर चर्चा करेन, असंही पवार म्हणाले.

'शिखर बँक प्रकरणी ईडीने माझ्यावर गुन्हा दाखल केला होता. त्यासाठी उत्तर देण्यासाठी आज ईडी कार्यालयात जाण्याचा निर्णय घेतला होता. याबद्दल २४ तारखेला मी जाहीर केलं होतं. त्यानुसार, आज गेलो होता. परंतु, काल संध्याकाळी ईडीच्या संचालकांनी मला न येण्याची विनंती केली होती. परंतु, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी मला तिथे जाऊन आपली भूमिका मांडावी अशी विनंती केली होती. त्यानंतर मुंबई पोलीस आयुक्त आणि उपायुक्त यांनी मला दोन वेळा विनंती केली की, कायदा सुवव्यस्थेची परिस्थिती विपरीत होऊ नये, म्हणून त्यांनी विनंती केली. त्यामुळे तिचा स्वीकार केला आणि ईडी कार्यालयामध्ये न जाण्याचा निर्णय घेतला,' अशी माहितीही पवारांनी दिली.

अजितदादांचा राजीनामा कुटुंब कलहातून? शरद पवारांची UNCUT मुलाखत

Published by: Akshay Shitole
First published: September 28, 2019, 9:02 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading