पिंपरीतील गोळीबार प्रकरणात धक्कादायक खुलासा, जावयावर झाडल्या 5 गोळ्या

पिंपरीतील गोळीबार प्रकरणात धक्कादायक खुलासा, जावयावर झाडल्या 5 गोळ्या

आंतरजातीय विवाहाच्या रागातून चुलत सासऱ्यानेच जावयावर गोळीबार केल्याची माहिती समोर आली आहे.

  • Share this:

गोविंद वाकडे, पिंपरी-चिंचवड, 9 मे : पिंपरीतील गोळीबार प्रकरणाला धक्कादायक वळण मिळालं आहे. आंतरजातीय विवाहाच्या रागातून चुलत सासऱ्यानेच जावयावर गोळीबार केल्याची माहिती समोर आली आहे. तरुणावर गोळीबार झाल्याची घटना काल (बुधवारी)समोर आली होती.

पिंपरीत तुषार पिसाळ या तरूणावर बुधवारी दुपारी गोळीबार झाला. या गोळीबारात तुषार जखमी झाला असून त्याच्यावर पुण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

आंतरजातीय विवाहाच्या रागातून मुलीच्या चुलत्याने तुषार पिसाळ या आपल्या जावयावर गोळीबार केला आहे. याप्रकरणी राजू तावरे, आकाश तावरे, सागर तावरे, सागर पालवे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून ह्या पैकी तिघांना अटक केल्याची माहिती पोलीस उपायुक्त विनायक ढाकणे ह्यांनी दिली आहे

राजू तावरे याची पुतणी आणि आकाश तावरे याची बहीण विद्या व तुषार या दोघांनी काही दिवसांपूर्वी आंतरजातीय विवाह केला आहे. या विवाहाला तावरे कुटुंबाचा विरोध होता.

बुधवारी संध्याकाळी तुषार त्याच्या मित्रांसह एका लग्नाला गेला होता. तेथून परत येताना तुषार याची दुचाकी बंद पडली होती. ते सातच्या सुमारास चांदणी चौकात बंद पडलेल्या पेट्रोल पंपासमोर आले. विद्याचे चुलते राजू तावरे, भाऊ आकाश तावरे, सागर तावरे आणि त्यांचा मित्र सागर पालवे यांनी तुषारला घेराव घातला. राजू तावरे याने तुषारवर पिस्तूल रोखून मागून व पुढून अशा एकूण पाच गोळ्या झाडल्या.तुषारच्या पाठीत, पोटात आणि छातीमध्ये गोळ्या लागल्याने तो गंभीर जखमी झाला आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून आंतरजातीय विवाहामुळे हल्ला केल्याच्या घटना वाढत आहेत. खोट्या प्रतिष्ठेसाठी थेट टोकाचं पाऊल उचलण्यात येत आहे. त्यामुळे हा विचार थांबणार तरी कधी, असा प्रश्न आता उपस्थित करण्यात येत आहे.

VIDEO: नाशिकमध्ये पाणीबाणी, पाण्याअभावी 40 मोरांचा तडफडून मृत्यू

First published: May 9, 2019, 1:46 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading