पिंपरी चिंचवड, 27 जून : पिंपरी चिंचवडमधील डांगे चौक इथं तरुणीवर भरदिवसा चाकूने वार करण्यात आला. गौरी माळी असं या घटनेत जखमी झालेल्या तरुणीचे नाव असून तिच्यावर वार करणाऱ्या विकास शेटे या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. जखमी तरुणी स्पंदन रुग्णालयात 'रिसेप्शनिस्ट' आहे. सकाळी ती नेहमीप्रमाणे कामावर येत असताना आरोपी विकासने पाठीमागून येऊन तिच्यावर चाकूने सपासप वार केले. या हल्ल्यात जखमी झालेल्या गौरीला एका खासगी रुग्णालयात उपचारसाठी दाखल करण्यात आले आहे.