Home /News /maharashtra /

पिंपरी चिंचवडमध्ये टेम्पोची स्विफ्ट कारला जोरदार धडक, अंगावर काटा आणणारा VIDEO समोर

पिंपरी चिंचवडमध्ये टेम्पोची स्विफ्ट कारला जोरदार धडक, अंगावर काटा आणणारा VIDEO समोर

भीषण अपघातात जखमी झालेली एक महिला अत्यवस्थ असून अन्य एक जण गंभीररित्या जखमी झाल्याची घटना घडली आहे.

पिंपरी चिंचवड, 24 मे : लॉकडाऊन असल्यामुळे वाहतूक बंद आहे आणि रस्ते मोकळे असतील असा समज करून तुम्ही काही निमित्त भरधाव वेगात वाहन चालवून प्रवास करत असाल तर तुमचा घात होऊ शकतो. कारण अशाच भरधाव जाणाऱ्या दोन वाहनांची समोरा-समोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात जखमी झालेली एक महिला अत्यवस्थ असून अन्य एक जण गंभीररित्या जखमी झाल्याची घटना घडली आहे. पिंपरी शरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर या मुख्य चौकात ही घटना आज दुपारी 1 वाजताच्या सुमारास घडली. यामध्ये जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरून मुंबईकडे जाणाऱ्या स्विफ्ट कार वर समोरून भरधाव वेगात येणारा तीन चाकी टेम्पो धडकला. प्रत्यक्षदर्शीने सांगितलेल्या माहितीनुसार, हा अपघात एव्हडा भीषण होता की दोन्हीही वाहनांच्या धडकेत रस्त्याच्या बाजूला असलेले संरक्षक कठडे तुटले तर अपघातग्रस्त वाहनातील दोन व्यक्ती गंभीर जखमी झाले आहेत. लॉकडाऊनच्या मागील 65 दिवसातील रस्त्यावर झालेला हा शहरातील पहिलाच गंभीर अपघात आहे. दरम्यान, लॉकडाऊनच्या काळातही महाराष्ट्रातील इतर भागात अपघातांची मालिका सुरू आहे. पंढरपूर तालुक्‍यातील गोपाळपूर येथील दोन सख्या भावांना पिकअपने धडक दिल्याने दोघांचा मृत्यू झाला होता. हा अपघात 23 मे पहाटे साडेपाचच्या सुमारास पंढरपूर-मंगळवेढा रस्त्यावर झाला. दोघे भाऊ पहाटे मंगळवेढा रस्त्यावर व्यायामासाठी गेले असताना हा अपघात झाला. गोपाळपूर येथील बाळासाहेब निर्मळे गुरव यांना विजय (वय 19) आणि दयानंद (वय 16) ही दोन मुले होती. मोठा मुलगा विजय सैन्यामध्ये भरती होण्यासाठी त्याचे मामा नागनाथ गुरव (रा. जवळा) यांच्याकडे गावाजवळील भोकसेवाडी (ता. सांगोला) येथे राहून अभ्यास करत होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तो गावी गोपाळपूर येथे राहण्यास आला होता. संपादन - अक्षय शितोळे
Published by:Akshay Shitole
First published:

पुढील बातम्या