अवघ्या 9 दिवसांत अख्खं कुटुंब उद्धवस्त, एकाच कुटुंबातील 3 भावांचा कोरोनाने घेतला बळी

कोरोनामुळे एकाच घरातील तिघा भावंडाचा बळी जाण्याची राज्यातील ही पहिलीच घटना आहे .

कोरोनामुळे एकाच घरातील तिघा भावंडाचा बळी जाण्याची राज्यातील ही पहिलीच घटना आहे .

  • Share this:
पिंपरी चिंचवड, 20 जुलै : पिंपरी चिंचवडमध्ये एकाच कुटुंबातील 3 भावांचा कोरोनामुळे (Coronavirus) मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. कोरोनाची लागण झाल्याने या तिघांवरही उपचार सुरू होते. मात्र अवघ्या नऊ दिवसांत या तिघांचाही मृत्यू झाला. कोरोनामुळे एकाच घरातील तिघा भावंडाचा बळी जाण्याची राज्यातील ही पहिलीच घटना आहे . या घटनेमुळे पिंपरी गावातील कलापुरे कुटुंबावर शोककळा पसरली आहे . पोपटराव कलापुरे , ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली कलापुरे आणि दिलीपराव कलापुरे असे करोनामुळे मृत्यू झालेल्या तीन सख्ख्या भावंडांची नावे आहेत. कलापुरे कुटुंबीय गेल्या चार वर्षांपासून पिंपरी गावात एकत्र राहत आहे. यापूर्वी ते खराळवाडी भागात वास्तव्यास होते. 5 जुलै रोजी त्यांच्या कुटूंबातील एका मुलास कोरोनाची लागण झाली. त्यांचे एकत्र कुटुंब असल्याने घरातील सर्व 18 जणांची करोनाची चाचणी करण्यात आली. या चाचणीमध्ये कुटुंबातील सर्वचजण कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्यावर चिंचवडमधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. पोपटराव, ज्ञानेश्वर आणि दिलीपराव या तिघांनाही ह्रदयासंबंधित आजार होते. आपल्याला कोरोना झाल्याची धास्ती या तिघांनीही घेतली. यापैकी दिलीप यांना प्रथम अतिदक्षता विभागात व्हेन्टीलेटरवर ठेवण्यात आले. त्यानंतर पोपटराव आणि ज्ञानेश्वर यांनाही श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने तिघांनाही अतिदक्षता विभागात व्हेन्टीलेटरवर ठेवण्यात आले. 10 जुलै रोजी उपचारादरम्यान दिलीप यांचा मृत्यू झाला. यामुळे पोपटराव आणि ज्ञानेश्वर हे आणखीनच घाबरले. त्यानंतर पोपटराव यांचा 15 जुलै रोजी तर ज्ञानेश्वर यांचा 17 जुलै रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला. एकाच घरातील तीन भावंडांचा कोरोनामुळे अवघ्या नऊ दिवसांत मृत्यू झाल्याने कलापुरे कुटुंबीयांवर शोककळा पसरली. पोपटराव कलापुरे हे महापालिकेच्या नोकरीतून सेवानिवृत्त झाले होते. ते कामगार नेते म्हणून सुपरिचित होते. तसंच त्यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कामगार पथसंस्थेचे अध्यक्षपदही भूषविले होते. तर ज्ञानेश्वर कलापुरे हे हिंदुस्थान ऍण्टीबोटिक्स कंपनीतून निवृत्त झाले होते. ते पैलवान म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध होते. तर तिसरे बंधू केएसबी पंप्स या कंपनीतून निवृत्त झाले होते. ते देखील पैलवान म्हणून प्रसिद्ध होते. दरम्यान, या घटनेमुळे पिंपरी चिंचवड शहरात हळहळ व्यक्त होत आहे . पिंपरी चिंचवड शहरात करोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कोरोना बाधितांच्या संख्येने आता 11 हजारांचा टप्पाही ओलांडला आहे. त्यामुळे नागरिकांना आता आणखी काळजी घ्यावी, असं आवाहन करण्यात येत आहे.
Published by:Akshay Shitole
First published: