1 सेकंदाचा उशीर अन् जीव वाचला, पिकअप जीपच्या भीषण अपघाताचा CCTV VIDEO

1 सेकंदाचा उशीर अन् जीव वाचला, पिकअप जीपच्या भीषण अपघाताचा CCTV VIDEO

या अपघातात एका दुचाकीस्वार थोडक्यात बचावला आहे. एका सेकंदाचा उशीर झाला म्हणून वाचला नाहीतर पिकअप जीपखाली दुचाकीस्वार चिरडला असता.

  • Share this:

जालना, 23 ऑक्टोबर : जालना-औरंगाबाद महामार्गावर गुरुवारी संध्याकाळ एक विचित्र अपघात पाहायला मिळाला. भरधाव पिकअप मिनी जीप चक्क दोन चाकांवर आडवी जात उटली झाली आणि अपघात झाला. या अपघातात थोडक्यात दुचाकीस्वार बचावला आहे. गुरुवारी संध्याकाळी जालन्याहून औरंगाबादकडे निघालेल्या पिकअप जीपला भीषण अपघात झाला आहे.

भरधालव पिकअप जीपवरील चालकाचं नियंत्रण अचानक सुटलं आणि जीप दोन चाकांवर आडवी घसरत काही अंतर दूर गेली आणि उलटी झाली. जीपवर असलेलं सामान रस्त्यावर कोसळलं.

हे वाचा-VIDEO : नंदुरबारनंतर आणखीन एक भीषण अपघात, 150 मीटर दूरपर्यंत आडवी घसरत गेली बस

या अपघातात एका दुचाकीस्वार थोडक्यात बचावला आहे. एका सेकंदाचा उशीर झाला म्हणून वाचला नाहीतर पिकअप जीपखाली दुचाकीस्वार चिरडला असता. या घटनेनंतर काही काळासाठी वाहतूक विस्कळीत झाली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पाहाणी केली.

गाढे जळगांव फाट्यावर झालेल्याा या विचित्र अपघात कॅमेऱ्यात कैद झाला आहे. जीपवरचं चालकाचं नियंत्रण सुटल्यानं ही घटना घडली. सुदैवाने समोरून येणारा एक दुचाकीस्वार या अपघातातून सेकंदासाठी वाचला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. हा अपघात किती भयंकर आहे ते हा व्हिडीओ पाहून लक्षात येईल.

Published by: Kranti Kanetkar
First published: October 23, 2020, 10:28 AM IST

ताज्या बातम्या