Home /News /maharashtra /

पिकअप-दुचाकीची समोरासमोर जोरात धडक, आजोबा-नातवाचा जागीच मृत्यू

पिकअप-दुचाकीची समोरासमोर जोरात धडक, आजोबा-नातवाचा जागीच मृत्यू

आजोबा आणि नातवाचा अपघातात मृत्यू झाल्यामुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

कुर्डूवाडी, 02 फेब्रुवारी : पिकअप जीप आणि मोटारसायकलच्या समोरासमोर झालेल्या धडकेत आजोबा आणि नातू जागीच ठार झाल्याची घटना पंढरपूरमध्ये घडली. कुर्डूवाडी तालुका माढा इथं दुपारी 2 वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातात अभिजित रमेश मोरे (वय–२२, रा. कन्हेरगाव), महादेव नामदेव डांगे (६५, रा. पिंपळनेर, माढा) यांचा मृत्यू झाला. टेंभुर्णीकडून कुर्डुवाडीच्या दिशेने बोलेरो पिकअप भरधाव वेगात निघाली होती. ही पिकअप कुर्डूवाडी हद्दीत झुंडरे वस्ती नजीक आली असता, ओव्हरटेक करण्याच्या नादात समोरुन येणाऱ्या मोटारसायकलला जोराची धडक दिली. या धडकेत मोटारसायकलवरील आजोबा आणि नातू जागीच ठार झाले. हा अपघात इतका भीषण होता की, धडकेनंतर मोटारसायकल दूरपर्यंत फेकली गेली. यात गंभीर जखमी होऊन आजोबा आणि नातवाचा मृत्यू झाला.आजोबा आणि नातवाचा अपघातात मृत्यू झाल्यामुळे परिसरात शोककळा पसरली आहे. ट्रकच्या धडकेत लाडक्या नातीसह आजीचा मृत्यू आपल्या लाडक्या नातीला घेऊन मोटरसायकलने निघालेल्या आजी-आजोबांच्या गाडीला अपघात झाल्याने त्यात आजी आणि नातीचा मृत्यू झाला. नगर- पुणे रोडवरील कामरगाव शिवारातील स्माईल स्टोन जवळ रात्री आठच्या सुमारास ही घटना घडली. मधुकर ठोकळ (वय 58 कामरगाव, ता.नगर) हे त्यांची पत्नी आशा ठोकळ आणि त्यांची नात ईशा अमोल ठोकळ यांच्यासह नगरहून कामरगावकडे जात होते. हे तिघेही मोटरसायकलने जात होते. यावेळी स्माईल स्टोनजवळ समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या धडकेत आशा ठोकळ आणि ईशा ठोकळ यांचा मृत्यू झाला, तर मधुकर ठोकळ हे किरकोळ जखमी झाले आहेत. अपघात होताच अज्ञात वाहन चालक वाहनासह घटनास्थळावरून पळून गेला. घटनास्थळावरील नागरीक मदतीसाठी धावले. त्यांनी जखमींना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आशा आणि ईश ठोकळ मृत झाल्याचे सांगितले. आजी आणि नातीचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येतोय. या मार्गावर अपघाताच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येते आहे. जीप आणि ट्रक चालक अतिशय वेगाने वाहनं चालवतात. त्यामुळे अपघात घडत असल्याचं म्हटलं जातंय. याचा मोठा फटका छोटी वाहन आणि दुचाकीस्वारांना होत आहे.

तुमच्या शहरातून (महाराष्ट्र)

Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या