आता फक्त मुख्यमंत्र्यांशीच चर्चा करणार, फुरसुंगीच्या गावकऱ्यांचा पवित्रा

आता फक्त मुख्यमंत्र्यांशीच चर्चा करणार, फुरसुंगीच्या गावकऱ्यांचा पवित्रा

विजय शिवतारे मध्यस्थी करण्यासाठी फुरसुंगीला पोहोचले खरे पण त्यात त्यांना सपेशल अपयश आलंय आता चर्चा होईल तर फक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच असा पवित्रा गावकऱ्यांनी घेतलाय.

  • Share this:

06 मे : गेल्या वीस दिवसांहुन अधिक रेंगाळलेला पुण्याची कचराकोंडी अजूनही कायम आहे. जलसंपदा मंत्री विजय शिवतारे मध्यस्थी करण्यासाठी फुरसुंगीला पोहोचले खरे पण त्यात त्यांना सपेशल अपयश आलंय आता चर्चा होईल तर फक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच असा पवित्रा गावकऱ्यांनी घेतलाय.

पुण्याच्या कचराकोंडी प्रश्नी विजय शिवतारे यांनी आयबीएन लोकमतच्या बेधडक कार्यक्रमात आज शनिवारी कचरा प्रश्न सोडवणार अशी भूमिका घोषणा केली. आज ठरल्याप्रमाणे शिवतारे फुरसुंगी गावात पोहोचले. पण, आमच्याशी न बोलता कोणत्या आधारे शिवतारेंनी घोषणा केली अशी नाराजी ग्रामस्थांनी उपस्थिती केली. शिवतारे यांनी कौन्सिल हॉलला बैठकी बोलावली. पण फुरसुंगी आणि उरळी देवाचीच्या ग्रामस्थांचा उपस्थित रहायला साफ नकार दिला. काळ्या पटट्या लावून मौन आंदोलन सुरूच ठेवलंय.

मग स्वत: शिवतारे आंदोलनस्थळी पोहोचले. आंदोलकांशी तासभर त्यांनी चर्चा केली.  पण त्यांच्या शब्दावर गावकऱ्यांना विश्वासच बसत नसावा. त्यांना मधातच थांबवून काही गावकऱ्यांनी सवाल विचारले. काहीही करा, कुठली आश्वासनं नकोतच, हा कचरा डेपो हटवा अशीच मागणी गावकऱ्यांनी केली.

आता थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीच चर्चा करणार असा पवित्रा फुरसुंगीकरांनी घेतला. उद्या मुख्यमंत्री फडणवीस पुण्यात येण्याची शक्यता आहे. उद्या जर मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलावली तर चर्चेला जाऊ अशी नवी भूमिका ग्रामस्थांनी घेतलीये.  त्यामुळे आता फुरसुंगीचा कचरा डेपोचा प्रश्न सोडवण्याची जबाबदारी आता थेट मुख्यमंत्र्यांवर येऊन ठेपली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 6, 2017 01:24 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading