पाच पट फी वाढ सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसारच,वैद्यकीय शिक्षण संचालकांचं स्पष्टीकरण

पाच पट फी वाढ सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसारच,वैद्यकीय शिक्षण संचालकांचं स्पष्टीकरण

ही फी वाढ सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसारच असल्याचं स्पष्टीकरण राज्याचे वैद्यकीय शिक्षण संचालक प्रवीण शिनगारे यांनी दिलंय.

  • Share this:

11 मे : पुण्यासह महाराष्ट्रातल्या सगळ्या मेडिकल कॉलेजेसनी पाच पट फी वाढ केलीय. ही फी वाढ सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसारच असल्याचं स्पष्टीकरण राज्याचे वैद्यकीय शिक्षण संचालक प्रवीण शिनगारे यांनी दिलंय.

आयबीएन लोकमतने मेडिकल फी वाढीविरोधात विशेष मोहिम सुरू केलीये. यावर शिनगारेंनी सविस्तर उत्तरं देण्याचा प्रयत्न केला. पण फी वाढ रद्द करणार का ह्याचं उत्तर मात्र शिनगारे देऊ शकले नाहीत. विद्यालयांनी विषयवार जागांसाठी फिवाढ केलीये. सेंटर काऊंन्सिलच्या नियमाप्रमाणे 10 टक्के स्टाफ कमी असल्याची मर्यादा असते. त्यावरुन फी ठरते असते अशी माहिती शिनगारे यांनी दिली. तसंच  वाढलेलं शुल्क भरण्यासाठी मुदत वाढवून देण्यासाठी मी कॉलेजेशी बोलेन असं आश्वासनही त्यांनी दिलं.

First published: May 11, 2017, 8:08 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading