....तर पेट्रोल-डिझेल 7-8 रुपयांनी स्वस्त होईल-गडकरी

....तर पेट्रोल-डिझेल 7-8 रुपयांनी स्वस्त होईल-गडकरी

"मात्र यासाठी सर्व राज्यांना पुढाकार घेतला तर हे शक्य आहे, असं झालं तर राज्य सरकारचं नुकसान होणार नाही उलट महसूल वाढेल"

  • Share this:

पुणे, 01 जून : जर पेट्रोल डिझेलला जीएसटीमध्ये आणलं तर पेट्रोल 7-8 रुपयांनी स्वस्त होईल मात्र यासाठी सर्व राज्यांना पुढाकार घेतला तर हे शक्य आहे असं दिलासादायक वक्तव्य केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरींनी म्हंटलंय.

पेट्रोल डिझेलचे दर हे आंतरराष्ट्रीय पातळीवर वाढल्यानं देश पातळीवर देखील हे दर  वाढतात. ते कमी करण्यासाठी सरकारकडून लाँग टर्म विचार सुरू असल्याचं केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरींनी म्हंटलंय.

आम्ही ज्यावेळी जीएसटी लागू केलं त्यावेळी सर्वच राज्य सरकारांनी जीएसटीच्या अंतर्गत पेट्रोल-डिझेल आणू नये त्यामुळे सरकारच्या महसुलावर परिणाम होईल असं सांगितलं. पण जेव्हा याबद्दल आर्थिक सल्लागारांना विचारलं असता त्यांनी पेट्रोल डिझेलचे भाव कमी होतील असं सांगितलं होतं.जर पेट्रोल डिझेलला जीएसटीमध्ये आणलं तर पेट्रोल 7-8 रुपयांनी स्वस्त होईल असं गडकरींना सांगितलं.

मात्र यासाठी सर्व राज्यांना पुढाकार घेतला तर हे शक्य आहे, असं झालं तर राज्य सरकारचं नुकसान होणार नाही उलट महसूल वाढेल असंही नितीन गडकरींनी सांगितलं.

First published: June 1, 2018, 9:25 PM IST

ताज्या बातम्या