News18 Lokmat

राज्यात पेट्रोल 2 तर डिझेल 1 रुपयांनी स्वस्त

आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत अधिभारात घट करण्याचा निर्णय घेण्यात आलाय.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Oct 10, 2017 04:25 PM IST

राज्यात पेट्रोल 2 तर डिझेल 1 रुपयांनी स्वस्त

10 आॅक्टोबर : केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील अबकारी कर कमी केल्यामुळे महाराष्ट्रातही पेट्रोल 2 रुपये आणि डिझेल 1 रुपयांनी स्वस्त करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय. आज मध्यरात्रीपासून नवे दर लागू होणार आहे.

मागील आठवड्यात 4 आॅक्टोबर रोजी केंद्र सरकारने अबकारी करात कपात करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे देशातील वेगवेळ्या राज्यात पेट्रोल 2 रुपये आणि डिझेल 1 रुपयांनी स्वस्त झालं होतं. मात्र, राज्यात अजूनही याबाबत निर्णय घेण्यात आला नाही.

आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत अधिभारात घट करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. त्यामुळे आज मध्यरात्रीपासून पेट्रोल 2 रुपये आणि डिझेल 1 रुपयाने स्वस्त होणार आहे.  जनतेच्या रोषानंतर आधी केंद्र सरकार आणि आता राज्य सरकारला जाग आलीये आणि पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी करण्यात आलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 10, 2017 04:24 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...