ईडी -सीबीआयला कोर्टात खेचणार, अंजली दमानियांचा आक्रमक पवित्रा

ईडी -सीबीआयला कोर्टात खेचणार, अंजली दमानियांचा आक्रमक पवित्रा

' ईडी, सीबीआय आणि पोलिसांचा सर्रास राजकीय बळासाठी वापर केला जात आहे. आता केंद्रामध्ये भाजप सत्तेत आहे'

  • Share this:

मुंबई, 26 डिसेंबर : राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना नोटीस बजावली आहे. ईडी आणि सीबीआयचा सर्रास राजकारणासाठी वापर होत आहे असा आरोप सत्ताधारी करत आहे. तर दुसरीकडे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (anjali damania)  यांनी ईडी (ED) आणि सीबीआयच्याविरोधात (CBI) न्यायालयात याचिका दाखल करण्याची तयारी केली आहे.

टीव्ही 9 मराठी वृत्तवाहिनीशी बोलत असताना अंजली दमानिया यांनी थेट आता ईडी आणि सीबीआय या संस्थेविरोधात लढाई पुकारणार असल्याचे सांगितले आहे.

'ईडी सीबीआय विरोधात हायकोर्टामध्ये याचिका दाखल करणार आहे. ईडी, सीबीआय आणि पोलिसांचा सर्रास राजकीय बळासाठी वापर केला जात आहे. आता केंद्रामध्ये भाजप सत्तेत आहे. त्यांनी ईडीचा वापर केला यात काहीही शंका नाही. त्यामुळे आपण न्यायालयात याचिका दाखल करणार आहे', असं दमानिया यांचं म्हणणं आहे.

...म्हणून भारतात तयार करण्यात आलेल्या 'या' मॅराडोना केकवर भडकले फॅन्स!

तसंच 'आताच्या घटकाला एकनाथ खडसे यांना ईडीची नोटीस मिळाली आहे की नाही ते मला माहिती नाही. माझा लढा हा भ्रष्टाचाराच्या विरोधात आहे. एक याचिका ही मुंबई हायकोर्टामध्ये दाखल आहे. तर दुसरी याचिकाही भोसरी सेशन्स कोर्टामध्ये आहे. जर ईडीने या प्रकरणाची चौकशी केली आणि मला जबाब देण्यासाठी बोलावलं तर नक्की जाईल' असंही दमानिया यांनी सांगितलं.

एकनाथ खडसेंनी अखेर सोडलं मौन, ED ची नोटीस मिळाल्यानंतर म्हणाले...

विशेष म्हणजे, अंजली दमानिया आणि एकनाथ खडसे यांच्यातील वाद हा सर्वश्रूत आहे. दमानिया यांनी खडसे यांच्यावर एकापाठोपाठ अनके गंभीर आरोप केले होते. त्यांच्या आरोपांमुळे खडसे यांच्या अडचणीत वाढ  झाली होती. पण, आता एकीकडे खडसेंना ईडीने नोटीस बजावली आहे तर दुसरीकडे दमानिया यांनी थेट ईडी आणि सीबीआयला कोर्टात खेचण्याची तयारी सुरू केली आहे.

Published by: sachin Salve
First published: December 26, 2020, 4:19 PM IST
Tags:

ताज्या बातम्या