मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /'तिहेरी तलाक'च्या विरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल

'तिहेरी तलाक'च्या विरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल

तिहेरी तलाक गुन्हा ठरवण्याच्या केंद्र सरकारच्या अध्यादेशाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे.

तिहेरी तलाक गुन्हा ठरवण्याच्या केंद्र सरकारच्या अध्यादेशाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे.

तिहेरी तलाक गुन्हा ठरवण्याच्या केंद्र सरकारच्या अध्यादेशाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे.

    मुंबई, 24 सप्टेंबर : तिहेरी तलाक गुन्हा ठरवण्याच्या केंद्र सरकारच्या अध्यादेशाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. अध्यादेश बेकायदा आणि मनमानी पद्धतीनं काढण्यात आल्याचा याचिकेत आरोप करण्यात आला आहे. मुंबईतील माजी नगरसेवक मसूर अन्सारी, सामाजिक संस्था रायझिंग व्हॉईस फाऊंडेशन आणि वकील देवेंद्र मिश्रा यांनी ही याचिका दाखल केली आहे.

    या अध्यादेशामुळे मुस्लिम पुरुषांच्या मुलभूत अधिकारांवर गदा आली असल्याचा आरोप याचिकाकर्त्यांनी केला आहे. या अध्यादेशाद्वारे मुस्लिम पुरुषांना टार्गेट केलं असल्याचा याचिकेत आरोप करण्यात आला आहे. तिहेरी तलाक देणं गुन्हा ठरवण्याच्या तरतुदीला स्थगिती देण्याची याचिकेत मागणी करण्यात आली आहे.

    या अध्यादेशानुसार तिहेरी तलाक दिल्यास पतीला ३ वर्षांची शिक्षा होऊ शकते. तसंच पीडीत स्रीला आणि तिच्या अपत्याला आर्थिक मदत मिळण्याची तरतूद करण्यात आली आहे. अपत्य सज्ञान नसल्यास त्याचा ताबा मिळवण्यासाठी मॅजिस्ट्रेटकडे पीडीत महिला दाद मागू शकते. या याचिकेवर हायकोर्टात येत्या शुक्रवारी सुनावणी होणार आहे.

     VIDEO : लातूरमध्ये देशातील ड्रोन फार्मिंगचं पाहिलं प्रात्यक्षिक यशस्वी

    First published:
    top videos

      Tags: Against, Bombay high court, Corporator Masroor Ansari, Filed, Lawyer Devendra Mishra, Petition, Social organization Raising Voice Foundation, Triple divorce