मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

राज्यांतर्गत प्रवासासाठी रेल्वेची मोठी घोषणा, उद्यापासून बुकिंग सुरू

राज्यांतर्गत प्रवासासाठी रेल्वेची मोठी घोषणा, उद्यापासून बुकिंग सुरू

काल राज्यांतर्गत प्रवासासाठी लागू केलेला ई-पास रद्द करण्यात आला असून आज रेल्वेने मोठी घोषणा केली आहे

काल राज्यांतर्गत प्रवासासाठी लागू केलेला ई-पास रद्द करण्यात आला असून आज रेल्वेने मोठी घोषणा केली आहे

काल राज्यांतर्गत प्रवासासाठी लागू केलेला ई-पास रद्द करण्यात आला असून आज रेल्वेने मोठी घोषणा केली आहे

  • Published by:  Meenal Gangurde
नवी दिल्ली, 1 सप्टेंबर : राज्यभरात हळूहळू लॉकडाऊन शिथिल होत आहे. गेल्या 4 ते 5 महिन्यांपासून देशभरात सुरू असेलला कोरोनाचा कहर सुरूच आहे. या काळात लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे सर्व सेवा बंद ठेवण्यात आल्या होत्या. मात्र अनलॉकमध्ये हळूहळू या सेवा पूर्ववत केल्या जात आहे. सध्या देशात Unlock -4 ची सुरुवात झाली असून यादरम्यान अनेक सेवा सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान काल राज्यात प्रवासासाठी ई-पासची सक्ती रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, तर दुसरीकडे मध्ये रेल्वेनेही राज्यांतर्गंत प्रवासी वाहतूक पुन्हा सुरू करण्याचा परवानगी दिली आहे. राज्यांतर्गत रेल्वे बुकिंग उद्या 2 सप्टेंबरपासून सुरू होत असल्याचे मध्य रेल्वेने काढलेल्या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. आरक्षण पद्धतीने 2 सप्टेंबरपासून राज्यांतर्गत प्रवासी वाहतूक सुरू होणार असल्याचे रेल्वेने स्पष्ट केले आहे.  लॉकडाऊनदरम्यान परराज्यातील नागरिकांना घरी पोहोचविण्यासाठी रेल्वेने विशेष ट्रेन चालविल्या होत्या. सध्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकल गाड्या सुरू आहेत. मात्र अद्यापही सर्वसामान्य प्रवाशांसाठी लोकल सुरू करण्यात आलेली नाही. अद्याप याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. मुंबई आणि MMR मध्ये शासकीय कार्यालय 30 टक्के क्षमतेने सुरु राहणार आहेत, तर उर्वरित महाराष्ट्रात शासकीय कार्यालयात 50 टक्के कर्मचारी उपस्थित राहतील. या सर्व कार्यालयांमध्ये सोशल डिस्टन्स या नियमावलीचे पालन करणे अनिवार्य राहील.  शाळा मात्र सप्टेंबर अखेर पर्यंत सुरु करता येणार नाहीत. ऑनलाईन क्लासेसच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण द्यावे लागेल. त्याचबरोबर कॅन्टोन्मेंट झोन भागांमध्ये आधीचेच नियमावली परत लागू राहील. स्थानिक परिस्थिती बघून जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्त याबाबत अंतिम निर्णय घेतील. अनलॉक-4 मध्ये काय सुरू होणार काय बंद राहणार... -हॉटेल आणि लॉज 100 टक्के सुरु होणार. -शाळा आणि कॉलेज 30 सप्टेंबरपर्यंत बंदच राहणार. -30 सप्टेंबरपर्यंत मेट्रो धावणार नाही. -खासगी बस आणि मिनी बसला प्रवासासाठी मुभा. -सिनेमागृह 30 सप्टेंबरपर्यंत राहणार बंदच. -मंदिर आणि जिमबद्दल अद्याप कोणतीही घोषणा नाही. -सिनेमा हॉल, स्विमिंग पूल, मनोरंजन पार्क, थेटर्स आणि बिअर बारवरील बंदी कायम -संस्कृतिक, सामाजिक, क्रीडा शैक्षणिक क्षेत्रातले कार्यक्रम तसेच मोठ्या प्रमाणात लोकांना एकत्र येता येणार नाही. -आता आवश्यक सेवेतील सर्व दुकाने आधीच या नियमावलीचे पालन करतील.. - मुंबई आणि एमएमआर एरिया तसेच पुणे पिंपरी या क्षेत्रांमध्ये ऑफिसमध्ये 30 टक्के कर्मचारी उपस्थिती राहता येईल. त्याव्यतिरिक्त इतर राज्यात 50 टक्के आता कर्मचारी उपस्थित राहू शकतात या सर्व कार्यालयांमध्ये सोशल डिस्टन्स या नियमावलीचे पालन करणे अनिवार्य राहील. - जिल्हा अंतर्गत प्रवासासाठी आता ई-पास गरज नाही. - प्रवास करताना चालकासह टॅक्सीत चार तर रिक्षामध्ये तीन प्रवाशांना मुभा.
First published:

Tags: Central railway

पुढील बातम्या