निर्दयीपणे गोवंश कत्तलीसाठी नेण्याचा डाव लोकांनी उधळला

निर्दयीपणे गोवंश कत्तलीसाठी नेण्याचा डाव लोकांनी उधळला

नागरिकांनी आणि गोरक्षकांनी तो वाहन अडवून थेट सदर बाजार पोलीस ठाण्यात घेऊन गेले

  • Share this:

विजय कमळे पाटील, प्रतिनिधी

जालना, 19 जानेवारी :  जवाहरबाग येथील पांजरापोळचा गोवंश निर्दयीपणे कत्तलीसाठी घेऊन जाण्याचा कट स्थानिक नागरिकांनी उधळून लावला. या प्रकरणी पोलिसांनी वाहनचालकाला ताब्यात घेतलं आहे.

शहरातील जवाहरबाग परिसरात काही इसम एका छोटा हत्ती वाहनातून एका गोवंशाचे हातपाय बांधून त्याला निर्दयीपणे कत्तलीसाठी नेत असल्याचं काही नागरिकांच्या निदर्शनास आलं. त्यानंतर एका गोवंशाला अतिशय निर्दयीपणे टॅम्पोतून कत्तलीसाठी नेत होते. त्यानंतर काही नागरिकांनी ते वाहन अडवले.

दरम्यान,  नागरिकांनी आणि गोरक्षकांनी तो वाहन अडवून थेट सदर बाजार पोलीस ठाण्यात घेऊन गेले. दरम्यान, सदर बाजार पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक रमेश रुपेकर, समाधान तेलंगरे आणि बबलू घोरपडे यांनी गोवंशप्रेमी नागरिकांच्या मदतीने गोवंशाची सुटका करून त्याला उपचारासाठी स्थानकवासी जैन समाजाच्या गोशाळेत दाखल केलंय.

याप्रकरणी वाहनचालकला ताब्यात घेण्यात आले असून पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत सदर गोवंश हा जवाहरबाग परिसरतीलच गोरक्षण पंजरापोळचा असून त्यांनी तेथील काही लोकांनीच 10 हजारात सदर गोवंश विकल्याची चर्चा सुरू आहे. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून गोरक्षणाच्या नावावर गोशाळामध्येच गोवंश विक्रीचा काळाबाजार चालतोय का यादृष्टीने पोलिसांचा तपास सुरू आहे.

मंगळवेढ्यात तरुणाने घरातच गळफास घेऊन केली आत्महत्या

दरम्यान, मंगळवेढा तालुक्यातील उचेठाण येथे तरूणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. बापू हरिशचंद्र लोखंडे(वय25)असं आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. या तरूणाने नेमकं कोणत्या कारणामुळे हे टोकाचं पाऊल उचललं याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

मंगळवेढा तालुक्यातील कारखाना चौकातील पत्र्याच्या घरात केबलच्या वायरने बापू हरिशचंद्र लोखंडे(वय25)याने 18 जानेवारी रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याची माहिती मिळताच लोकांनी बघण्यासाठी एकच गर्दी केली होती. याबाबतची फिर्याद हरिशचंद्र लोखंडे यांनी मंगळवेढा पोलिस ठाण्यात दिली आहे.

वडिलांच्या फिर्यादीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या 25 वर्षीय तरुणाच्या मृत्यूची नोंद अकस्मात म्हणून करण्यात आली आहे. याबाबत घोसळगाव पोलीस अधिक तपास करत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 19, 2020 05:32 PM IST

ताज्या बातम्या