...आणि गीतांजली एक्सप्रेसचे प्रवासी थोडक्यात बचावले

...आणि गीतांजली एक्सप्रेसचे प्रवासी थोडक्यात बचावले

काल रात्री 11च्या सुमाराला मनमाडच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 2च्या रुळाला तडा गेला. पण तेव्हा ते कुणाला कळलं नाही. तेव्हाच, 12860 हावडा-मुंबई गीतांजली एक्स्प्रेस तिथून पास झाली. सुदैवानं ही गाडी रुळांवरून घसरली नाही.

  • Share this:

मनमाड, 09 जानेवारी : मनमाड स्थानकावर काल हावडा-मुंबई गीतांजली एक्स्प्रेसच्या प्रवाशांचा जीव थोडक्यात वाचला. काल रात्री 11च्या सुमाराला मनमाडच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 2च्या रुळाला तडा गेला. पण तेव्हा ते कुणाला कळलं नाही. तेव्हाच, 12860 हावडा-मुंबई गीतांजली एक्स्प्रेस तिथून पास झाली. सुदैवानं ही गाडी रुळांवरून घसरली नाही.

विशेष म्हणे मनमाड जंक्शनहून पास होताना तिचा सरासरी वेग ताशी 90 किमी एवढा असतो. यामुळे, सर्वच प्रवासी थोडक्यात बचावले म्हणायचं. काही वेळानं रेल्वे स्थानकावरच्या 2 वेटर्सना हा तडा दिसला, आणि त्यांनी स्टेशन मास्टरांना कळवलं. गेल्या काही वर्षांपासून देशभरात रुळाला तडे जाण्याच्या घटना खूप वाढल्या आहेत. रुळांची डागडुजी करायला पुरेसा वेळ रेल्वेला मिळत नाही का, आणि यामागे गाड्यांची प्रचंड संख्या हे कारण आहे का, याचं उत्तर रेल्वेनं दिलं पाहिजे.

First Published: Jan 9, 2018 12:52 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading