डॉ.शीतल आमटे यांच्या श्रद्धांजली सभेला सुद्धा कौटुंबिक वादाची किनार!

डॉ.शीतल आमटे यांच्या श्रद्धांजली सभेला सुद्धा कौटुंबिक वादाची किनार!

डॉ.शीतल आमटे-करजगी यांच्या स्मृती प्रित्यर्थ आज आनंदवन येथे त्यांच्या समाधीस्थळी एका श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते.

  • Share this:

हैदर शेख, प्रतिनिधी

चंद्रपूर, 13 डिसेंबर :   ज्येष्ठ समाजसेवक दिवंगत बाबा आमटे (Baba Amte) यांची नात आणि महारोगी सेवा समितीच्या सीईओ डॉ.शीतल आमटे-करजगी (sheetal amte karajgi) यांच्या  श्रद्धांजली सभेला आमटे-करजगी परिवारातील वादाची किनार पाहण्यास मिळाली.  श्रद्धांजली सभेला आमटे कुटुंबीतील काही सदस्य हे अनुपस्थिती होते.

दिवंगत समाजसेविका -आनंदवनच्या सीईओ  डॉ.शीतल आमटे-करजगी यांच्या स्मृती प्रित्यर्थ आज आनंदवन येथे त्यांच्या समाधीस्थळी एका श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, या श्रद्धांजली सभेला पुन्हा एकदा आमटे आणि करजगी परिवारातील वादाची किनार दिसून आली. या श्रद्धांजली सभेला आनंदवनशी निगडित अनेकांनी प्रत्यक्ष आणि झुम अॅपद्वारे हजेरी लावली, डॉ. आमटे यांच्या बद्दलच्या आपल्या भावना व्यक्त केल्या.

पाकिस्तानची न्यूझीलंडमधली विघ्न संपेना, खेळाडूंच्या कोरोनानंतर आता आणखी एक धक्का

मात्र, आमटे परिवारातील एकही व्यक्ती या सभेला उपस्थित नव्हता. डॉ.शीतल आमटे यांच्या मृत्यूनंतर त्यांचे सासू-सासरे म्हणजे शिरीष आणि सुहासिनी करजगी यांनी फेसबुकवर एक पोस्ट लिहून आमटे परिवारावर अनेक गंभीर आरोप केले होते.

या पोस्टमुळे डॉ.शीतल आमटे यांच्या मृत्यूबद्दल अनेक प्रश्न निर्माण झाले होते. मात्र, श्रद्धांजली सभेला कुटुंबीय हजेरी लावतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, आमटे कुटुंबियांच्या अनुपस्थितीमुळे वाद अजूनही कायम असल्याचेच पुन्हा एकदा दिसून आले.

दरम्यान, फेसबुकवर लिहिलेल्या पोस्ट बाबत आणि आमटे कुटुंबीयांच्या गैरहजेरी बाबत करजगी परिवाराने काहीही बोलण्यास नकार दिला.

90 टक्के लोकांची चौकशी पूर्ण

तर आमटे यांच्या मृत्यू प्रकरणी आतापर्यंत या प्रकरणी 16 जणांचा जबाब नोंदवला आहे.  शीतल आमटे यांच्याशी नजीकच्या काळात संभाषण झालेल्या 90 टक्के लोकांची चौकशी पूर्ण झाली आहे. आतापर्यंत करण्यात आलेल्या तपासात डॉ. शीतल आमटे यांनी विषारी इंजेक्शन घेत आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाल्याची माहिती आहे. पण नेमके विष कोणते होते याबाबतचा खुलासा पोस्टमोर्टमच्या सविस्तर अहवालात स्पष्ट होणार आहे.

भाजपचा ओबीसी आरक्षणासाठी एल्गार, पण OBC नेत्यांनीच फिरवली बैठकीकडे पाठ!

मात्र, आजही प्राथमिक पोस्टमोर्टम अहवाल पोलिसांनी जाहीर केला नाही. शीतल आमटे यांचा घातपात तर झाला नाही ना,  या दृष्टीने पोलीस शक्यता पडताळून पाहत आहे. त्यामुळे आत्महत्येपूर्वी शीतल आमटे यांनी कुणाशी संवाद साधला, त्यांना कुणाचे फोन आले, त्यांना कोण-कोण भेटली अशी माहिती पोलीस गोळा करत आहे. तसंच, शीतल आमटे या मानसिक तणावाखाली होत्या, त्यामागचं कारण काय होतं, याचा तपासही पोलीस करत आहे.

शीतल आमटे यांचा लॅपटॉप,टॅब, मोबाईल जप्त

विशेष बाब म्हणजे, डॉ. शीतल यांचा लॅपटॉप-टॅब-मोबाईल नागपूरच्या फॉरेन्सिक पथकाने ताब्यात घेत मुंबईतील IT तज्ज्ञांकडे पाठविला आहे. डॉ. शीतल यांनी या गॅजेटचे पासवर्ड नुकतेच बदलले होते व याची माहिती त्यांचे पती गौतम करजगी यांना देखील नव्हती.

सॉफ्टवेअर पासवर्ड लॉक असल्याने दिशा मिळणारा तपास खुंटला आहे. विशेष म्हणजे, यापैकी काही गॅजेटमध्ये डॉ. शीतल यांनी स्वतःचे डोळे पासवर्ड ठेवला असल्याने प्रक्रिया अवघड झाली. डॉ. शीतल यांचे नोकर आणि घरगुती मदतनीस यांची चौकशी करण्यात आला.

शीतल आमटे आणि सामाजिक काम

डॉ. शीतल आमटे या विकास आणि भारती आमटे यांच्या कन्या होत्या. 2003 मध्ये नागपूरमध्ये वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएसचं शिक्षण घेतलं होतं. त्या एक उत्तम फोटोग्राफर सुद्धा होत्या. जानेवारी 2016 मध्ये आंतरराष्ट्रीय आर्थिक मंचद्वारे 'यंग ग्लोबल लीडर 2016' साठी त्यांची निवड झाली होती. एप्रिल 2016 मध्ये संयुक्त राष्ट्राकडूनही नवोदित राजदूत म्हणूनही शीतल आमटे यांची निवड करण्यात आली होती.

सिंहांचा पाठलाग करता करता थेट तुरुंगात पोहोचले 2 युवक, नेमकं काय घडलं पाहा VIDEO

वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर शीतल आमटे यांनी कुटुंबीयांचा समाजसेवेचा वारसा जोपासण्यासाठी आनंदवनातच काम करण्याचा निर्णय घेतला होता. विशेष म्हणजे, शीतल आमटे या अपंगत्व विशेषज्ज्ञ म्हणूनही प्रसिद्ध होत्या. त्यानंतर त्यांनी महारोगी सेवा समितीची सर्व सूत्र आपल्या हाती घेतले होते.

Published by: sachin Salve
First published: December 13, 2020, 4:50 PM IST
Tags:

ताज्या बातम्या