घरी नको म्हणून वृद्धाश्रमात सोडलं, त्यांनी घेतला असा निर्णय की, तुम्हीही कराल सलाम!

घरी नको म्हणून वृद्धाश्रमात सोडलं, त्यांनी घेतला असा निर्णय की, तुम्हीही कराल सलाम!

स्वकियांनी सांभाळ करण्यास नकार दिलेल्या वृद्धांनी समाजासाठी एक मोठा निर्णय घेतला.

  • Share this:

हैदर शेख, प्रतिनिधी

चंद्रपूर, 16 नोव्हेंबर : स्वकियांनी सांभाळ करण्यास नकार दिलेल्या वृद्धांनी समाजासाठी एक मोठा निर्णय घेतला. इतरांना जीवदान मिळावं यासाठी वृद्धांनी देहदानाचा निर्णय घेतला.

'मरावे परी किर्ती रुपे उरावे' अशी म्हण प्रत्यक्षात आणली आहे चंद्रपुरातील वृद्धांनी... चंद्रपुरातील याच मातोश्री आश्रमातील 17 वृद्धांनी देहदानाचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं मरणानंतरही अवयव रुपानं हे वृद्ध जीवंत राहाणार आहे.

त्यांच्या देहदानानं अनेकांना जीवदान मिळणार आहे. देहदानाचा संकल्प केलेल्या 4 वृद्धांचा आश्रमात मृत्यू झाला. त्यानंतर त्यांच्या शरीराचं दान करण्यात आलंय. आपल्यामुळं इतरांना जीवदान मिळणार असल्यानं त्याचा आनंद असल्याच्या भावना वृद्धांनी व्यक्त केल्यात.

मातोश्री वृद्धाश्रमात नेहमीच विविध सामाजिक उपक्रम हाती घेतले जातात. या सामाजिक उपक्रमातून प्रेरणा मिळाल्यानंतर वृद्धांनी देहदानाचा संकल्प केल्याची माहिती आश्रमातील संचालकांनी दिली.

वृद्धाचे मृतदेह शासकीय वैद्यकीय हॉस्पिटलमध्ये देण्यात येणार आहे. त्यामुळे वृद्धांनी घेतलेल्या निर्णयाचं स्वागत हॉस्पिटलच्या अधिष्ठतांनी केलं आहे.

वृद्धांनी देहदानाच्या घेतलेल्या निर्णयातून इतरांनाही देहदानासाठी प्रेरणा मिळणार अशी अपेक्षा करायला काही हरकत नाही. मात्र, वृद्धांनी घेतलेल्या देहदानाच्या संकल्पनेचं सर्व स्तरातून कौतुक होतं आहे.

=============================

First published: November 16, 2019, 10:56 PM IST
Tags: chandrapur

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading