मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

पुलवामा हल्ला: शिक्षिकेने शेअर केली 'पाकिस्तान जिंदाबाद'ची पोस्ट, संतप्त नागरिकांनी पेटवलं घर

पुलवामा हल्ला: शिक्षिकेने शेअर केली 'पाकिस्तान जिंदाबाद'ची पोस्ट, संतप्त नागरिकांनी पेटवलं घर

belgaon

belgaon

बेळगाव जिल्ह्यामधील सौंदत्ती तालुक्यातील शिवापूर गावातील एका शिक्षिकेने पाकिस्तान जिंदाबाद असा मजकूर सोशल मीडियावर व्हायरल केल्याने पोलिसांनी त्या शिक्षिकेला अटक केली.

बेळगाव, 17 फेब्रुवारी : जम्मू काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. त्यातच एका शिक्षिकेने पाकिस्तान जिंदाबाद अशी एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केल्यामुळे संतप्त नागरिकांना महिलेचं घर जाळण्याचा प्रयत्न केला आहे. तप पोलिसांनी या महिलेला अटकदेखील केली आहे.

बेळगाव जिल्ह्यामधील सौंदत्ती तालुक्यातील शिवापूर गावातील एका शिक्षिकेने पाकिस्तान जिंदाबाद असा मजकूर सोशल मीडियावर व्हायरल केल्याने पोलिसांनी त्या शिक्षिकेला अटक केली. त्यानंतर संतप्त जमावाने तिच्या घरावर दगडफेक करत घर पेटविण्याचा प्रयत्न केला.

पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यामुळे सर्वत्र संताप व्यक्त होत असतानाच शिवापूर (ता. सौंदत्ती) येथील झिजायला ममदापुर नामक शिक्षिकेने पाकिस्तान जिंदाबाद असा मजकूर व्हाट्सअॅपवर व्हायरल केला होता. त्यामुळे मुरगोड पोलिसांनी शनिवारी महिलेला अटक करून देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे.

ही माहिती समजताच संतप्त जमावाने त्या शिक्षिकेच्या घरावर दगडफेक करत घर पेटवून देण्याचा प्रयत्न केला. याची माहिती मिळताच मुरगोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यानंतर यरगट्टी रोडवरही रस्ता रोको करून निदर्शने केली.

फुटीरतावाद्यांना मोदी सरकारचा दणका; सुरक्षेसोबत अन्य सर्व सुविधा काढून घेतल्या

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारने प्रथम पाकिस्तानला आणि आता काश्मीरमधील फुटीरतावाद्यांना दणका दिला आहे. मोदी सरकारने काश्मीरमधील सर्व फुटीरतावाद्यांची सुरक्षा काढून घेतली आहे. यात हुरियत कॉन्फरन्सचा नेता मीरवाईज उमर फारुक, अब्दुल गनी बट्ट, बिलाल लोन, हाशिम कुरैशी, शब्बीर शाह शामिल यांचा समावेश आहे.

वाचा- पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात; आत्मघाती हल्लेखोराला दिले होते प्रशिक्षण

सरकारने दिलेल्या आदेशानुसार, फुटीरतावाद्यांना देण्यात आलेली सुरक्षा आणि गाड्या आजपासून काढून घेण्यात येत आहेत. या नेत्यांना सुरक्षा जवानांकडून कोणत्याही प्रकारची सुरक्षा दिली जाणार नाही. तसेच सरकारकडून त्यांना अन्य काही सुविधा दिल्या असतील तर त्या तात्काळ मागे घेतल्या जातील. केंद्र सरकारच नाही तर राज्य सरकारकडून फुटीरतावादी नेत्यांना पोलिस सुरक्षा अथवा अन्य काही सुविधा दिल्या असतील तर त्या देखील मागे घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

पुलवामामध्ये गुरुवारी सीआरपीएफच्या जवानांवर झालेल्या आत्मघाती हल्ल्यात 40 जवान शहीद झाले होते. त्यानंतर देशभरात पाकिस्तानच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी सुरु आहे. देशातील नागरिकांच्या या मागणीनंतर मोदी सरकारने देखील कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. यासंदर्भात शनिवारी नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या निवासस्थानी सर्वपक्षीय बैठक झाली.

वाचा- पुलवामा हल्ल्यात नवा खुलासा, इब्राहिम अझर हाच मुख्य सूत्रधार

पुलवामामध्ये गुरुवारी सीआरपीएफच्या जवानांवर झालेल्या आत्मघाती हल्ल्यात 40 जवान शहीद झाले होते. त्यानंतर देशभरात पाकिस्तानच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी सुरु आहे. देशातील नागरिकांच्या या मागणीनंतर मोदी सरकारने देखील कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. यासंदर्भात शनिवारी नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या निवासस्थानी सर्वपक्षीय बैठक झाली.

VIDEO: शोकसभेच्या परवानगीसाठी गेलेल्या CRPF जवानाला पोलिसांची बेदम मारहाण

First published:

Tags: CRPF, Jammu kashmir, Pulwama attack, Pulwama terror attack, Terror attack