Home /News /maharashtra /

पोलीस स्टेशनमध्ये घुसून कर्मचाऱ्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण, वाचा काय आहे कारण?

पोलीस स्टेशनमध्ये घुसून कर्मचाऱ्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण, वाचा काय आहे कारण?

नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. थेट पोलीस ठाण्यातील पोलिसाला मारहाण करण्यात आली आहे. (People Beating Police) चोरीला गेलेल्या पीकअप वाहनाचा शोध का लावत नाहीत, अशी विचारणा आरोपींनी केली.

  नंदुरबार, 15 मे : नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यात थेट पोलीस ठाण्यातील पोलिसाला मारहाण करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. (People Beating Police) चोरीला गेलेल्या पीकअप वाहनाचा शोध का लावत नाहीत, अशी विचारणा आरोपींनी तक्रारदारांनी पोलीस ठाण्यातच धुडगूस घातला आणि पोलीस कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केली. नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव पोलीस ठाण्यात ही घटना घडली. याप्रकरणी तिघांविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी तसेच मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिल सुकलाल पावरा, लकड्या सुकलाल पावरा आणि सुकलाल वल्या पावरा अशी गुन्हा दाखल झालेल्यांचा नावं आहेत. तिघेही धडगाव तालुक्यातील वलवाड येथील रहिवाशी आहेत. नेमकं काय घडलं? पावरा यांच्या मालकीचा पीकअप चोरीला गेला आहे. यानंतर त्याचा तपास पोलीस करत नाहीत, असा राग मनात धरुन पावरा कुटुंबातील सदस्य धडगाव पोलीस ठाण्यात गेले. तेथे त्यांनी शिवीगाळ करुन पोलीस कर्मचारी शशिकांत रमेश वसईकर यांची कॉलर पकडली. इतकेच नव्हे तर त्यांना जमिनीवर पाडून मारहाण केली. हेही वाचा - भीषण अपघातात गाडीचा अक्षऱशः चक्काचूर झाला; मात्र चालकाला खरचटलंही नाही, थक्क करणारा VIDEO
  कागदपत्रेही फेकले -
  संतापाच्या भरात पावरा कुटुंबीयांनी पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केल्यानंतर दुसऱ्या टेबलवरील महिला पोलीस कर्मचारी सविता पाचुर्णे यांच्याकडील कागदपत्रे फेकून दिली. दरम्यान, या प्रकारानंतर पोलीस कर्मचारी शशिकांत वसईकर यांनी फिर्याद दिली. यानंतर तिघांविरुद्ध धडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संपूर्ण तपास पोलीस निरीक्षक जी. आर. औताडे करत आहेत.
  Published by:News18 Desk
  First published:

  Tags: Maharashtra News, Police

  पुढील बातम्या