मेडीगड्डाची जनसुनावणी एका तासात गुंडाळली;नागरिकांमध्ये रोष

या प्रकल्पामुळे अनेक गाव पाण्याखाली जाणार असल्यामुळे या प्रकल्पाला स्थानिक विरोध करत आहेत.यासाठी आयोजित करण्यात आलेल्या जनसुनावणी प्रश्नांची उत्तर न देता अधिकाऱ्यांनी एका तासात गुंडाळल्यामुळे नागरिकांच्या मनात संतापाची भावना आहे.

Chittatosh Khandekar | News18 Lokmat | Updated On: Sep 28, 2017 10:38 AM IST

मेडीगड्डाची जनसुनावणी एका तासात गुंडाळली;नागरिकांमध्ये रोष

सिरोंचा, 28 सप्टेंबर: मेडीगड्डा प्रकल्पाच्या वादामुळे गडचिरोली-तेलंगणा सीमा भागातील वातावरण तापलं आहे. या प्रकल्पामुळे अनेक गाव पाण्याखाली जाणार असल्यामुळे या प्रकल्पाला स्थानिक विरोध करत आहेत.यासाठी आयोजित करण्यात आलेल्या जनसुनावणी प्रश्नांची उत्तर न देता अधिकाऱ्यांनी एका तासात गुंडाळल्यामुळे नागरिकांच्या मनात संतापाची भावना आहे.

महाराष्ट्र तेलंगणा सीमेवर गोदावरी नदीवर तेलंगाणा सरकार मेडीगड्डा कालेश्वर धरण उभारतं आहे. पण या धरणा संदर्भात आदिवासी जनतेमध्ये प्रचंड अज्ञान आहे. . धरणासंदर्भातली माहिती देण्यासाठी काल सिरोंचा तालुक्यात पोचमपल्ली इथे पर्यावरणविषयक जनसुनावणी घेण्यात आली होती. ही सुनावणी अधिकाऱ्यांनी एका तासातच गुंडाळली. अनेक प्रशनांची उत्तर त्यांनी दिली नाहीत. मेडीगड्डा प्रकल्पविरोधी समितीसह आदिवासी विद्यार्थी संघटनेने आक्षेप घेऊन लोकांची दिशाभूल करण्यासाठीच जनसुनावणी घेण्यात आल्याचा आरोप केलाय. तर गडचिरोलीचे पालकमंत्री अमरीश आत्राम यांच्या विरोधात आदिवासी विद्यार्थी संघटनेने घोषणाबाजी केली असुन परत एकदा या प्रकल्पाच्या विरोधात सीमावर्ती भागात संतप्त वातावरण पहायला मिळाले

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 28, 2017 10:38 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...