Home /News /maharashtra /

''पहचान कौन'' समीर दाऊद वानखेडे; नवाब मलिकांचे दोन खळबळजनक Tweet

''पहचान कौन'' समीर दाऊद वानखेडे; नवाब मलिकांचे दोन खळबळजनक Tweet

नवाब मलिक (Nawab Malik) यांनी पुन्हा एकदा एनसीबी अधिकारी समीर वानखेडे (NCB official Sameer Wankhede) यांच्यावर निशाणा साधला आहे.

    मुंबई, 25 ऑक्टोबर: राष्ट्रवादी काँग्रेस नेते (NCP leader) आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी पुन्हा एकदा एनसीबी अधिकारी समीर वानखेडे (NCB official Sameer Wankhede) यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी समीर दाऊद वानखेडे (Sameer Dawood Wankhede) यांच्या लग्नातला फोटो ट्विटरवर (Twitter) शेअर करुन खळबळ उडवून दिली आहे. या फोटोच्या सत्यतेबाबत कोणताही अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. तसंच एनसीबीनं देखील यावर काही अधिकृत भाष्य केलेलं नाही. नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यासंदर्भात दोन ट्विट केले आहेत. पहिल्या ट्विटमध्ये त्यांनी वानखेडे यांचा एकट्याचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करताना मलिक यांनी पहचान कौन? असा सवाल उपस्थित केला आहे. तर दुसऱ्या ट्विटमध्ये महापालिकेच्या एका सर्टिफिकेटचा फोटो पोस्ट केला आहे. शेअर केलेलं कागदपत्र नेमकं कशा संबंधातील आहे हे स्पष्टपणे दिसत नाही आहे. हे कागदपत्र शेअर करताना नवाब मलिक यांनी समीर दाऊद वानखेडे यांचं फर्जीवाडा येथून सुरु झालं असं कॅप्शन दिलं आहे. नवाब मलिकांनी एनसीबीच्या बोगस कारवाईवर आणि आघाडी सरकारला बदनाम करण्याच्या समीर दाऊद वानखेडे यांच्या मनसुब्यावर यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. आतापर्यंत अनेक पुरावे सादर करत मलिक यांनी आर्यन खान अंमली पदार्थ कारवाई कशी बोगस आहे हे पत्रकार परिषद घेऊन उघड केले आहेत. हेही वाचा- IPL इतिहासातील आज मोठा दिवस, BCCI करणार महत्त्वाची घोषणा! नवाब मलिक यांनी आज दोन ट्विट केलेत. आज दुपारी ते पत्रकार परिषद घेऊन या ट्विटबद्दल अधिक खुलासा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान एनसीबी किंवा समीर वानखेडे यांची यावर अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Nawab malik, NCB

    पुढील बातम्या