एनडीएत सामील होण्याचा प्रश्नच नाही- शरद पवार

एनडीएत सामील होण्याचा प्रश्नच नाही- शरद पवार

राष्ट्रवादी एनडीएत सामिल होण्यासंबंधीचं वृत्तं आता स्वतः शरद पवारांनीच खोडून काढलंय. मी कदापिही एनडीएसोबत जाणार नाही त्यामुळे केंद्रात पुन्हा मंत्री होण्याचा प्रश्नच येत नसल्याचं पवारांनी स्पष्ट केलंय. पवारांच्या या खुलाशामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमधला संभ्रमही एकदाचा मिटलाय.

  • Share this:

बारामती, 31 ऑगस्ट : राष्ट्रवादी एनडीएत सामील होण्यासंबंधीचं वृत्तं आता स्वतः शरद पवारांनीच खोडून काढलंय. मी कदापिही एनडीएसोबत जाणार नाही त्यामुळे केंद्रात पुन्हा मंत्री होण्याचा प्रश्नच येत नसल्याचं पवारांनी स्पष्ट केलंय. पवारांच्या या खुलाशामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमधला संभ्रमही एकदाचा मिटलाय. मोदी आणि पवारांच्या मैत्रीमुळे गेल्या आठवड्यापासून यासंबंधीच्या बातम्या येत होत्या. स्वतः शरद पवार यावर काहीच बोलत नसल्याने कार्यकर्त्यांची खुलासे देताना मोठी पंचाईत होत होती.

स्वाभिमानीचे बंडखोर मंत्री सदाभाऊ खोत यांनाही पवारांनी टोला लगावलायं. राजू शेट्टींनी एनडीए सोबतची युती तोडली तरी स्वाभिमानीच्या वाट्याचं मंत्रिपद सदाभाऊ खोत यांना सोडवत नाही, असा टोमणा पवारांनी हाणलाय. राजू शेट्टी एनडीएतून बाहेर पडल्यानंतर पवारांनी प्रथमच त्यांच्या भूमिकेचं अप्रत्यक्षपणे समर्थन केलंय. आणि सदाभाऊंना पुन्हा टार्गेट केलंय.

मुंबईतील पावसाच्या पूरस्थितीवरूनही शरद पवारांनी शिवसेनेला फटकारलंय. 26जुलैच्या पूरस्थितीतूनही मुंबई मनपाचा सत्ताधारी पक्षाने काहीच धडा घेतला त्यामुळेच मंगळवारी मुंबईतील सगळीकडे पाणी भरल्याचा आरोप पवारांनी केलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 31, 2017 02:20 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading