Home /News /maharashtra /

मोदी- पवार भेटीबद्दल बाहेर आलं ते अर्धसत्य; फडणवीसांनी केला मोठा खुलासा

मोदी- पवार भेटीबद्दल बाहेर आलं ते अर्धसत्य; फडणवीसांनी केला मोठा खुलासा

शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसबरोबर ऐतिहासिक आघाडी करत सरकार स्थापनेचा घाट घातला जात होता, तेव्हाच मोदी-पवार भेट झाली. या भेटीत नरेंद्र मोदींनी सुप्रिया सुळेंना मंत्रिपदाची ऑफर दिली होती, असा गौप्यस्फोट शरद पवारांनी केला होता.

पुढे वाचा ...
  मुंबई, 7 डिसेंबर : महाराष्ट्रात सत्तास्थापनेसाठी जोरदार हालचाली सुरू असताना शरद पवार दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटले. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसबरोबर ऐतिहासिक आघाडी करत सरकार स्थापनेचा घाट घातला जात होता,  तेव्हाच मोदी-पवार भेट झाली. या भेटीत नरेंद्र मोदींनी सुप्रिया सुळेंना मंत्रिपदाची ऑफर दिली होती, असा गौप्यस्फोट शरद पवारांनी काही दिवसांपूर्वी एका केला. पण हे अर्धसत्य असल्याचा दावा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. या भेटीबद्दल शरद पवार यांनी सांगितलं ती पूर्ण माहिती नाही. त्याआधी आणि नंतर काय बोलणं झालं हे कुणाला माहिती नाही, असं देवेंद्र म्हणाले. पंतप्रधान मोदींबरोबरच्या भेटीत शरद पवारांनी सांगितल्याप्रमाणे झालं, पण त्यातला अर्धा भाग बाहेर आलेला नाही. ते पूर्णसत्य नाही. मोदी- पवार संवादातला काही भाग अद्याप बाहेर आलेला नाही. तो योग्य फोरमवर बाहेर येईल, असा दावा फडणवीस यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच आपल्यापुढे युतीचा प्रस्ताव ठेवला होता, असं शरद पवारांनी उद्धव ठाकरेंचं सरकार स्थापन झाल्यावर सांगितलं. शरद पवार म्हणाले की, "पंतप्रधानांना भेटण्याची वेळ मी आधीच मागितली होती. मात्र ते जमू शकलं नाही. शेवटी पंतप्रधान कार्यालयाने वेळ दिली. संभ्रम निर्माण व्हावा अशी पंतप्रधान कार्यालयाची इच्छा असावी. मात्र मला त्याची काळजी नव्हती." पवारांनी एका मुलाखतीत हा गौप्यस्फोट केला होता. सुप्रिया सुळे यांना मंत्रिपदाचीही ऑफर भाजपने दिली होती, असं पवार म्हणाले होते. याविषयी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, "त्या बैठकीला मी नव्हतो. त्यामुळे मी त्याबद्दल आत्ता भाष्य करणार नाही. पण तिथे काय झालं याची मला माहिती आहे. योग्य वेळी योग्य व्यासपीठावर मी त्याबद्दल बोलेन."

  संबंधित - भविष्यात NCP भाजपबरोबर जाईल का? सुप्रिया सुळेंनी दिलं हे उत्तर

  अजित पवारांना बरोबर घेऊन सरकार स्थापन करण्याचा निर्णय एका रात्रीत कसा झाला, त्या रात्री नेमकं काय झालं त्याचा घटनाक्रम माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी झी 24 तासला दिलेल्या एका मुलाखतीत उलगडला. एका रात्रीत असे मोठे निर्णय होत नसतात, असं सांगताना फडणवीस म्हणाले, "दोन दिवस आधी ही चर्चा झाली. काही फिलर्स जात होते. आमच्या नेतृत्वाच्या स्तरावर काही गोष्टी घडत होत्या. पण स्पष्ट चर्चा अशी झालेली नव्हती."
  शपथविधीच्या आधी 2 दिवस अजित पवारांबरोबर चर्चा झाली होती, हे स्पष्ट करताना फडणवीस म्हणाले, "22 तारखेला रात्री ज्या वेळी या सगळ्या पार्श्वभूमीवर अजित पवार आमच्याकडे आले, आणि काँग्रेस- राष्ट्रवादी- शिवसेना या तीन पक्षांचं सरकार चालू शकत नाही, असं वाटत असल्याचं त्यांनी सांगितलं, त्या वेळी आम्ही सरकार स्थापनेची तयारी सुरू केली. राष्ट्रवादीच्या बहुतांश आमदारांचं मतही तसंच आहे, असं अजित पवार म्हणाले.
  वाचा - 'जय महाराष्ट्र' म्हणत एकनाथ खडसेंनी दिला 'वेगळा विचार' करण्याचा भाजपला इशारा "आम्ही सगळे भाजपबरोबर यायला तयार आहोत. कारण स्थिर सरकार आवश्यक आहे, असं अजित पवार म्हणाले. त्यांनी आमदारांच्या सह्यांचं पत्रही आणलं होतं. माझं काही आमदारांशी बोलणंही करून दिलं." अजित पवारांवर विसंबून सरकार स्थापना आम्ही त्यांच्याबरोबर जायला हवं की नको यावर वाद होऊ शकतात, पण त्या वेळी तो गनिमीकाव्याचा डाव होता, असं म्हणता येईल. पण तो डाव फसला, असं फडणवीस यांनी या मुलाखतीत कबूल केलं. "राजकारणात कधीकधी गनिमीकावा खेळावा लागतो. तो आमचा फसला. पण त्या वेळी तो आवश्यक वाटला", असं ते म्हणाले. वाचा - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 'या' कामासाठी राज्यपालांना केली विनंती "सगळ्यात मोठ्या पक्षाला या तीन पक्षांनी बाजूला काढलं होतं. जनादेश डावलून ते राजकारण करत होते. जनतेपुढे आम्ही एकत्र असल्याचा शब्द देत लढलो. तो शब्द मोडला त्याचं काय? असा सवालही फडणवीस यांनी केला. आपण अजित पवारांवर विसंबून सरकार स्थापन केलं. ज्या वेळी त्यांनी भाजपबरोबर येण्यास असमर्थता व्यक्त केली, त्यावेळी मीसुद्धा राजीनामा दिला, असं ते म्हणाले. 'साधा फोनही घेतला नाही ही खंत कायम राहील' शिवसेनेबरोबरच सत्तास्थापना करायची आमची मानसिकता होती. कारण तसाच जनतेचा कौल होता. मी स्वतः अगदी प्रामाणिकपणे चर्चा व्हावी यासाठी कसून प्रयत्न केले. उद्धवजींबरोबर चांगली मैत्री आहे. मी घरी येतो, आपण बोलू, मार्ग काढू असे निरोप दिले. पण उद्धवजींनी माझा साधा फोन घेण्याचंही टाळलं, ही खतं मनात नेहमी राहील, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. ---------------- अन्य बातम्या VIDEO : हैदराबाद Encounter वर सरन्यायाधीशांचं मोठं विधान! हैदराबाद Encounter : आरोपीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यास पत्नीचा नकार सुटकेसमध्ये सापडलेल्या 'त्या' अवयवांचा लागला छडा, मुलीनेच काढला बापाचा काटा
  Published by:Arundhati Ranade Joshi
  First published:

  Tags: BJP, Devendra Fadnavis, Narendra modi, Sharad Pawar (Politician)

  पुढील बातम्या