Home /News /maharashtra /

सरकारच्या उक्ती आणि कृतीमध्ये फरक, प्रवीण दरेकर यांचा मुख्यमंत्र्यांवर पलटवार

सरकारच्या उक्ती आणि कृतीमध्ये फरक, प्रवीण दरेकर यांचा मुख्यमंत्र्यांवर पलटवार

praveen darekar

praveen darekar

एकीकडे बॉलीवूडबद्दल दु:ख व्यक्त करायचं आणि दुसरीकडे...

मुंबई, 16 ऑक्टोबर: बॉलीवूडला (Bollywood) गेल्या काही दिवसांपासून ठराविक वर्गाकडून बदनाम करण्यात येत आहे. ही बाब अत्यंत वेदनादायक असून बॉलीवूडला संपवण्याचे किंवा इतरत्र हलवण्याचे प्रकार होताना दिसत आहे. मात्र आपण ते कधीही होऊ देणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Udhav thackeray) यांनी दिला आहे. त्यावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्र्यांवर पलटवार केला आहे. हेही वाचा..आजपासून सुरू होत आहेत सिनेमागृह! प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी हे चित्रपट सज्ज राज्यातील महत्त्वाच्या विषयांकडे दुर्लक्ष करण्यासाठी बॉलीवुडची बदनामी झाली, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणत आहेत.  या सरकारच्या उक्ती आणि कृतीमध्ये फरक आहे, अशी टीका देखील प्रवीण दरेकर यांनी केली आहे. एकीकडे बॉलीवूडबद्दल दु:ख व्यक्त करायचं आणि दुसरीकडे एका चित्रपट निर्मात्याला धमक्या येतायंत. म्हणायचं एक आणि करायचं एक, अशी सध्या राज्यात परिस्थिती असल्याचं दरेकर यांनी सांगितलं. बॉलीवूडची बदनामी करतायंत म्हणायचं आणि विनाकारण संघर्ष निर्माण करुन मूळ विषयांकडे दुर्लक्ष करण्याचा मुद्दाम, जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात असल्याचा आरोप देखील दरेकर यांनी सरकारवर केला आहे. मुंबईतून कोणीही बॉलीवूड बाहेर नेत नाही आहे. चित्रपटसृष्टी बाहेर जातेय असं म्हणत आपण स्थानिकांची बाजू घेत असल्याचं दाखवण्याचा हा प्रयत्न आहे, अशी सणसणीत टीका दरेकर यांची मुख्यमंत्र्यांवर केली आहे. 'पीएम नरेंद्र मोदी'च्या सहनिर्मात्याला धमकी... पीएम नरेंद्र मोदी या चित्रपटाचे सहनिर्माते अमित वाधवानी यांनी त्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याबद्दल मुंबई पोलीस आयुक्त परमबीरसिंह यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरही उपस्थित होते. वाधवानी यांनी यापूर्वी चेंबूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली आहे. परमबीरसिंह यांनी तातडीने संबंधित पोलिसांना या प्रकरणी लक्ष घालण्याचे आदेश दिले आहेत. काय म्हणाले होते मुख्यमंत्री..? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं की, मुंबई ही महाराष्ट्राची आर्थिकच नाही तर सांस्कृतिक राजधानी आहे. हॉलीवूड सिनेमांना टक्कर देणारे सिनेमे आज बॉलीवूडमध्ये बनत आहेत. या बॉलीवूड सिनेमांचा चाहतावर्ग जगभर आहे. सिनेसृष्टी हा एक मोठा मनोरंजन उद्योग क्षेत्र आहे. या क्षेत्रामुळे अनेकांना रोजगाराची संधी मिळते तर सिनेमांमुळे आपले कलाकार लोकप्रिय होतात, असे नमूद करत मुख्यमंत्री ठाकरे यांनी बॉलीवूडच्या बदनामी षडयंत्र रचणाऱ्यांना फैलावर घेतलं होतं. हेही वाचा..'खिसे गरम' करायचं गणित तुम्हाला थोडी स्वस्थ बसू देईल, चित्रा वाघ यांचा टोला दरम्यान, राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात झालेल्या निर्णयांचा आढावा घेण्याचा सपाटा महाविकास आघाडी सरकारने लावला आहे. आरेचं मेट्रो कार शेड रद्द करणे, जलयुक्त शिवारची चौकशी आणि आता नाणार प्रकल्पासाठी जमिन अधिग्रहित करतांना गैरव्यवहार झाला का याची चौकशी होणार आहे. विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी या संदर्भात आदेश दिले आहेत. अतिरिक्त जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती याची चौकशी करेल आणि एक महिन्याच्या आत अहवाल देईल असंही आदेशात म्हटलं आहे.
Published by:Sandip Parolekar
First published:

Tags: Bollywood, Maharashtra, Mumbai, Pravin darekar, Udhav thackeray

पुढील बातम्या