मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

BREAKING : संजय राऊतांच्या अडचणी वाढणार? ED कडून मुंबईत 2 ठिकाणी सर्च ऑपरेशन सुरू!

BREAKING : संजय राऊतांच्या अडचणी वाढणार? ED कडून मुंबईत 2 ठिकाणी सर्च ऑपरेशन सुरू!

ईडीच्या दोन टीमकडून सर्च ऑपरेशन सुरू आहे. या कारवाईबद्दल गुप्तता बाळगण्यात आली आहे.

ईडीच्या दोन टीमकडून सर्च ऑपरेशन सुरू आहे. या कारवाईबद्दल गुप्तता बाळगण्यात आली आहे.

ईडीच्या दोन टीमकडून सर्च ऑपरेशन सुरू आहे. या कारवाईबद्दल गुप्तता बाळगण्यात आली आहे.

    मुंबई, 17 ऑगस्ट : पत्राचाळ प्रकरणामध्ये शिवसेनेचे खासदार संजय राऊत (sanjay raut) सध्या न्यायालयीन कोठडी असून ऑर्थर रोडमध्ये मुक्कामी आहे. या प्रकरणात आता ईडीने (ed) मुंबईतील वेगवेगळ्या ठिकाणी धाडी टाकल्या आहेत. ईडीच्या दोन टीमकडून सर्च ऑपरेशन सुरू आहे. या कारवाईबद्दल गुप्तता बाळगण्यात आली आहे. पत्राचाळ प्रकरणामध्ये ईडी पुन्हा एकदा सक्रीय झाली आहे. संजय राऊत यांना अटक केल्यानंतर ईडीने राऊत यांची कोठडी मागितली नाही. त्यानंतर राऊतांना 22 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यानंतर आज ईडीने मुंबईतील वेगवेगळ्या ठिकाणी ईडीने छापे मारले आहे. कोण कोणत्या ठिकाणी छापे मारण्यात आले आहे, याबद्दल गुप्तता बाळगण्यात आली आहे. मात्र, पत्राचाळ प्रकरणामध्येच ही कारवाई सुरू आहे. एकूण 2 टीमकडून सर्च ऑपरेशन सुरू आहे. या कारवाईबद्दल कमालीची गुप्तता बाळगण्यात आलेली आहे. काय आहे प्रकरण? मुंबईमधील गोरेगाव येथील पत्राचाळीत महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाचा भूखंड आहे. पत्राचाळ परिसरातील 672 कुटुंबीयांचा पुनर्विकास करण्यासाठी 2008 मध्ये मे. गुरू-आशीष कन्स्ट्रक्शन्सची रहिवाशांनी नियुक्ती केली. मात्र त्यांनी या जागेचा काही भाग खासगी बिल्डरांना विकला. प्रवीण राऊत यांच्यावर पत्राचाळमध्ये राहणाऱ्या नागरिकांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. आशिष कन्स्ट्रक्शनला पत्राचाळमधील तीन हजार फ्लॅट बांधकाम करून 672 फ्लॅट भाडेकरूला द्यायचे होते. उर्वरित फ्लॅट म्हाडा आणि विकासक यांच्यात वाटून घ्यायचे होते. मात्र 2010 मध्ये प्रवीण राऊत यांनी गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीचे काही शेअर एचडीआयएलला विकले. या प्रकरणातील पैसा नेमका कुठे गेला यासंदर्भात ईडीने केलेल्या तपासामध्ये प्रवीण राऊत यांच्या नावाने एचडीआयएलमधून 100 कोटी वळवण्यात आल्याचं समोर आलं. 2010 मध्ये या आर्थिक घोटाळ्यातील 55 लाखांची रक्कम ही प्रवीण राऊत यांची पत्नी माधुरी राऊत यांच्या खात्यावरुन वर्षा राऊत यांच्या खात्यावर वळवण्यात आली. वर्षा राऊत या संजय राऊत यांच्या पत्नी आहेत. वर्षा यांनी ही रक्कम दादरमधील फ्लॅट घेण्यासाठी वापरल्याचा दावा ईडीने केला.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या