कोरोनाला हरवलं, पण रेल्वेखाली उडी देऊन मृत्यूला कवटाळलं

कोरोनाला हरवलं, पण रेल्वेखाली उडी देऊन मृत्यूला कवटाळलं

कोरोनाच्या उपचारानंतर पुन्हा एकदा चाचणी घेतली असता अहवाल निगेटिव्ह आला. त्यामुळे डिस्चार्ज देण्यात आला होता.

  • Share this:

सुमित सोनवणे, प्रतिनिधी

दौंड, 02 जुलै : दौंड तालुक्यातील बोरीपार्धी गावातील एका व्यक्तीने कोरोना आजारावर मात करीत हॉस्पिटलमधून घरी आल्यानंतर रेल्वे खाली उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

बोरीपार्धी येथे राहणाऱ्या एका 45 वर्षीय व्यक्तीस 24 जून रोजी कोरोनाची बाधा झाल्याचं समोर आलं होते. त्यानंतर कोरोनाची चाचणी केली असता लागण झाल्याचं अहवालात स्पष्ट झाले होते. त्यानंतर त्यांच्यावर पिंपरी येथील वाय.सी.एम हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. या व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्यामुळे घरातील इतर सदस्यांचीही चाचणी घेण्यात आली होती. यामध्ये  त्याच्या पत्नीचा अहवाल देखील पॉझिटिव्ह आला होता. तिच्यावरही सध्या उपचार सुरू आहेत.

'आता लय गुलीगत बेकार वाटतंय', टिकटॉकस्टार सुरजला कोसळलं रडू

कोरोनाच्या उपचारानंतर  पुन्हा एकदा चाचणी घेतली असता अहवाल निगेटिव्ह आल्याने त्या व्यक्तीला हॅास्पिटलमधून बुधवारी घरी सोडण्यात आले होते. रात्री ते बोरीपार्धीतील आपल्या घरी आले आणि आज पहाटे त्यांनी बोरीपार्धी मधील रेल्वे गेटाच्या पूर्व बाजूला रेल्वेखाली आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे.

बेपत्ता झालेल्या प्रेमीयुगुलाची गळफास घेऊन आत्महत्या, बुलडाण्यात खळबळ

या घटनेमुळे संपूर्ण दौंड तालुक्यात खळबळ उडाली आहे. कोरोनातून मुक्त झाल्यानंतरही या व्यक्तीने का आत्महत्या केली, याची माहिती अद्याप मिळू शकली नाही. या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक धनंजय कापरे तपास करीत आहे.

राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 1,80,289 वर

दरम्यान, राज्यातल्या कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे. (Maharashtra covid 19 patient) गेल्या  24 तासांमध्ये तब्बल 5537 नव्या रुग्णांची वाढ झाली असून ही विक्रमी संख्या आहे.  त्यामुळे एकूण रुग्ण संख्या 1,80,289 वर गेली आहे. राज्यात आज 189 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. राज्यात आत्तापर्यंत 8053 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आज 2243 जण बरे होऊन घरी गेलेत. राज्याचा मृत्यू दर 4.47 एवढा झाला आहे. 79,095 एवढे Active रुग्ण आहेत.

मुंबईत एकूण रुग्ण  79145 रुग्ण आहेत.  त्यातले 29715 रुग्ण हे Active आहेत. शहरात आज 69 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकूण मृत्यूची संख्या 1487वर गेली आहे.

संपादन - सचिन साळवे

First published: July 2, 2020, 3:43 PM IST
Tags: corona

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading