Home /News /maharashtra /

भावंडांचा करुण अंत! मोठ्या भावाचा शेततळ्यात पाय घसरला; वाचवायला गेलेल्या बहीणही बुडाली

भावंडांचा करुण अंत! मोठ्या भावाचा शेततळ्यात पाय घसरला; वाचवायला गेलेल्या बहीणही बुडाली

सातारा जिल्ह्यात ही हृदयद्रावक घटना घडली. मुलगा ITI करत होता, तर बहीण आठवीत शिकत होती. दोघे आईवडिलांबरोबर नातेवाईकांकडे गेले होते, तेव्हाच काळाने घाला घातला.

  कराड (सातारा), 18 जानेवारी – एका फार्महाउसवरील (Farm House) शेततळ्यात भावाला बुडताना पाहून वाचवण्यासाठी गेलेल्या बहीण-भावाचा (Brother-sister) हृदयद्रावक मृत्यू झाल्याची घटना पाटण (Patan accident) तालुक्यातल्या रोमनवाडी-येराड (Romanwadi-Yerad) इथं झाली आहे. ही घटना सोमवारी सायंकाळी घडली. मच्छिमारांच्या सहाय्याने दोघांचे मृतदेह शेततळ्यातून बाहेर काढण्यात आले. सौरभ अनिल पवार (वय 16) (saurabh pawar) आणि पायल अनिल पवार (वय 14, रा. काठी, ता. पाटण), (payal pawar) अशी त्यांची नावे आहेत. रोमनवाडी-येराड येथील फार्महाउसवर कामाला असलेल्या सचिन जाधव (sachin jadhav) या नातेवाईकाकडे अनिल पवार हे पत्नी आणि दोन मुलांसमवेत आले होते. सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास अनिल पवार (Anil Pawar) यांची मुले सौरभ व पायल फार्महाउसवरील पाण्याने काठोकाठ भरलेल्या शेततळ्याकडे गेली होती. सौरभ शेततळ्यातील पाण्यात घसरून पडला. त्याला बुडताना पाहून बहीण पायलने त्याला वाचवण्यासाठी धाव घेतली. पण तीसुद्धा शेततळ्यात बुडाली. आई-वडिलांचा हृदय पिळवटून टाकणारा टाहो दोन्ही मुले शेततळ्यात बुडाल्याची माहिती मिळताच सचिन जाधव आणि मुलांच्या आई-वडिलांनी शेततळ्याकडे धाव घेतली.

  Weather Forecast: राज्यात पुन्हा गारपिटीचं सावट; विकेंडला पुण्यासह या जिल्ह्यात कोसळणार सरी

   त्यांचा शोध घेण्यासाठी मच्छिमारांना बोलवण्यात आले. सायंकाळी सातच्या सुमारास दोन्ही मृतदेह हाती लागले. मुलांचे मृतदेह पाहून आई-वडिलांनी फोडला. दोघांचाही हंबरडा काळीज पिळवटून टाकणारा होता.
  मुलगा आयटीआय, मुलगी आठवीत काठी (ता. पाटण) येथील अनिल पवार काही वर्षांपासून कामानिमित्त पत्नी व मुलांसमवेत विजयनगर (ता. कराड) येथे वास्तव्यास आहेत. मुलगा सौरभ हा रेठरे बुद्रुक (ता. कराड) येथील आयटीआय महाविद्यालयात शिकत होता. मुलगी पायल ही विजयनगर येथील हायस्कूमध्ये आठवीच्या वर्गात शिकत होती.
  Published by:News18 Web Desk
  First published:

  Tags: Accident, Death, Satara

  पुढील बातम्या