ठणे, 26 मार्च, अजित मांढरे : ठाण्याच्या मुब्रामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रेल्वे प्रवाशाला जीवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या घटनेनं जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. रुमालाला आग लावून हा रुमाल अपंग प्रवाशाच्या अंगावर फेकण्यात आला. या घटनेमध्ये प्रवाशाच्या हाताला आणि मानेला गंभीर दुखापत झाली आहे. विशेष म्हणजे या जखमी प्रवाशाला उपचारासाठी तब्बल बारा तास बेड देखील मिळाला नसल्याची माहिती समोर येत आहे.
धावत्या रेल्वेतील घटना
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, धावत्या रेल्वेत प्रवाशाला जीवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. प्रमोद वाडेकर (वय 35) असं या अपंग प्रवाशाचं नाव आहे. हा प्रवासी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण लोकलमध्ये अपंग व्यक्तिच्या डब्यातून प्रवास करत होता. लोकल कळवा मुब्रा स्थानकात येताच एका गर्दुल्यानं त्याच्यासोबत वाद घातला. त्यानंतर रुमालाला आग लावून तो रुमाल या प्रवाशाच्या अंगावर फेकला. या घटनेत हा प्रवासी जखमी झाला.
घरी परताच मुलीची 'ती' अवस्था पाहून आई, वडिलांनी फोडला हंबरडा, घटनेनं पंढरपुरात खळबळ
बारा तास बेड मिळाला नसल्याची माहिती
विशेष म्हणजे या प्रवाशाच्या उपचारासाठी तब्बल बारा तास बेड मिळाला नसल्याची माहिती समोर येत आहे. मिळत असलेल्या माहितीनुसार आधी या प्रवाशाला कळव्याच्या छत्रपती रुग्णालयात नेले असता तिथे उपचाराची सोय नसल्याचं सांगण्यात आलं. त्यानंतर या प्रवाशाला उपचारासाठी केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं असात तिथे त्याला थेट सकाळी 11 च्या सुमारास बेड मिळाला. सध्या त्याच्यावर केईएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणातील संशयीत आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती रेल्वे लोहमार्ग पोलिसांकडून देण्यात आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.