मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

BREAKING : गोंदियामध्ये प्रवाशांनी भरलेली रेल्वे मालगाडीला धडकली, डब्बा रुळावरून घसरला

BREAKING : गोंदियामध्ये प्रवाशांनी भरलेली रेल्वे मालगाडीला धडकली, डब्बा रुळावरून घसरला

 रायपूरकडून नागपुरच्या दिशेने जाणाऱ्या "भगत की कोठी" एक्स्प्रेसला गोंदिया शहरालगत अपघात झाला

रायपूरकडून नागपुरच्या दिशेने जाणाऱ्या "भगत की कोठी" एक्स्प्रेसला गोंदिया शहरालगत अपघात झाला

रायपूरकडून नागपुरच्या दिशेने जाणाऱ्या "भगत की कोठी" एक्स्प्रेसला गोंदिया शहरालगत अपघात झाला

    रवी सपाटे, प्रतिनिधी गोंदिया, 17 ऑगस्ट : गोंदिया (gonidya) जिल्ह्यातून मोठी बातमी समोर आली आहे. रायपूरकडून नागपूरच्या दिशेने जाणाऱ्या "भगत की कोठी" एक्स्प्रेसला गोंदिया शहरालगत अपघात झाला आहे. समोर जात असलेल्या मालगाडीला भगत की कोठी ट्रेनने मागून धडक दिली. धडक दिल्यानंतर रेल्वेचा एक डब्बा रुळावरून खाली घसरला आहे. या अपघातात 50 पेक्षा जास्त प्रवासी किरकोळ जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. जखमी प्रवाश्यांवर जिल्हा सामान्य रुग्णालय व तसेच खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आज पहाटे 4 वाजेच्या सुमारास ही घटना घडली.  भगत की कोठी एक्स्प्रेस नागपूरच्या दिशेनं जात होती.  गोंदिया शहरालगत रेल्वे पोहोचली असता अचानक समोर जात असलेल्या मालगााडीला पाठीमागून रेल्वे धडकली. धडक दिल्यानंतर मोठा आवाज झाला आणि रेल्वेचा एक डब्बा रुळावरून खाली घसरला. पहाटे साखर झोपेत असलेल्या प्रवाशांना एकच धक्का बसला. डब्ब्यातील प्रवाशांना मोठा झटका बसला त्यामुळे 50 पेक्षा जास्त जण यात जखमी झाले. सुदैवाने रेल्वेचे वेग जास्त नसल्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. अपघाताची माहिती मिळताच रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलाच्या जवानही घटनास्थळी पोहोचले. जखमींना तातडीने शासकीय आणि नजीकच्या खासगी रुग्णालयामध्ये दाखल केले आहे. काही जणांना किरकोळ जखमा असल्यामुळे प्राथमिक उपचार करून सोडून देण्यात आले आहे. घटनास्थळी रेल्वेे कर्मचारी पोहोचलेले आहे, मदतकार्य सुरू आहे.  परंतु, नेमका हा अपघात कशामुळे घडला हे अद्याप समोर आलेले नाही, रेल्वेचे कर्मचारी या घटनेचा तपास करत आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या