Home /News /maharashtra /

धक्कादायक, धावत्या एसटी बसमध्येच प्रवाशाने केले विष प्राशन

धक्कादायक, धावत्या एसटी बसमध्येच प्रवाशाने केले विष प्राशन

उपचारादरम्यान जिल्हा सामान्य रुग्णालयात या प्रवाश्याची प्राणज्योत मालवली असून त्याची ओळख मात्र अद्याप पटू शकलेली नाही.

जालना, 04 जानेवारी :  गेवराई येथून एसटी बस (ST Bus) मधून प्रवास करीत असताना एका अनोळखी इसमाने बसमध्येच विष प्राशन (Poison) केल्याचा केल्याचा खळबळजनक घटना समोर आली आहे.  उपचारादरम्यान जिल्हा सामान्य रुग्णालयात या प्रवाश्याची प्राणज्योत मालवली असून त्याची ओळख मात्र अद्याप पटू शकलेली नाही. अंदाजे 50 वर्ष वयाचा एक अनोळखी इसम गेवराईहून अंबड जाण्यासाठी एसटी बसमध्ये बसला. बस अंबड जवळ पोचत असताना बसमध्ये दुर्गंधी येत असल्याची व एक प्रवाशी गंभीर असल्याचे प्रवाश्यांनी चालक आणि वाहकांच्या निदर्शनास आणून दिले. तेव्हा त्या प्रवाशाने विष प्राशन करून आत्महत्याचा प्रयत्न केला असल्याचं समजताच बसमध्ये एकच खळबळ उडाली. मुलीला पाहताच आईनं हसत सोडला जीव; कोरोनाग्रस्त मायलेकीच्या भेटीचा शेवटचा क्षण चालक आणि वाहकाने प्रवाश्यांच्या मदतीने सदर इसमास अंबड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. या ठिकाणी प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी सामान्य रुग्णालय येथे दाखल केले असता त्याची प्राणज्योत मालवली. दरम्यान, सदर इसमाची ओळख अद्याप पटू शकली नसून पोलीस त्यांचा तपास करत आहेत. बीड पोलीस अधीक्षक कार्यालयात तरुणाने घेतले विष दरम्यान, बीडमधील  पोलीस अधीक्षक कार्यालयातील महिला तक्रार निवारण केंद्रात एका तरुणा विष घेतल्याची धक्कादायक घटना घडली.  या तरुणाला तातडीने  बीड जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. इम्तियाज आमेन बकुरेशी (वय 30) असं विष घेणाऱ्या तरुणाचं नाव आहे.  बीड पोलीस अधीक्षक कार्यालयातील महिला तक्रार निवारण केंद्रात आज दुपारी 12.30 च्या दरम्यान ही घटना घडली. पत्नीला नांदवण्यास घेऊन जाणार नाही म्हणत इम्तियाज आमेन कुरेशीने विष प्राशन केले. महाराष्ट्रात मेट्रोमध्ये नोकरीची संधी;टेक्निशियन, इंजिनियर्ससह अनेक जागांवर भरती गेवराई शहरातील रहिवाशी असलेल्या इम्तियाज आमेन कुरेशी यांचे लग्न 10 वर्षांपूर्वी झाले होते. त्यांना दोन अपत्य आहेत. एका वर्षापूर्वी पती पत्नीत वाद झाल्यापासून त्यांची पत्नी माहेरी राहत होती. पत्नीला नांदवण्यास नकार दिल्याने 20  दिवसांपूर्वी पत्नीने तक्रार केली होती. पोलिसांनी त्याची समजूत काढली पण त्याने पत्नीला नांदवण्यास नकार दिला. अखेर आज त्याने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला.
Published by:sachin Salve
First published:

Tags: एसटी बस

पुढील बातम्या