एका चुकीने गेला तीन मुलींचा जीव, 15 जणांचं आयुष्य धोक्यात

एका चुकीने गेला तीन मुलींचा जीव, 15 जणांचं आयुष्य धोक्यात

सोलापूरच्या बार्शी कुर्डुवाडी मार्गावर वांगरवाडी शिवारात मुखेडहून मुंबईकडे येणाऱ्या प्रवाशी बसला भीषण अपघात झाला आहे.

  • Share this:

सागर सुरवसे, प्रतिनिधी

सोलापूर, 18 नोव्हेंबर: सोलापूरच्या बार्शी कुर्डुवाडी मार्गावर वांगरवाडी शिवारात मुखेडहून मुंबईकडे येणाऱ्या प्रवाशी बसला भीषण अपघात झाला आहे. प्रवाशी घेऊन चाललेली गझल (अंदोरा एक्सप्रेस mh04-gp-5151) ही लक्झरी बस  पलटी होऊन अपघात झाला आहे. धक्कादायक म्हणजे या भीषण अपघातात तीन चिमुरड्या मुलींचा मृत्यू झाला आहे.

काल रात्री साडे बाराच्या सुमारास  भीषण  अपघात घडला आहे. 3 मुलींचा मृत्यू झाला असून यात 15  पेक्षा अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत. यात कुणाचे पाय तर कुणाचं हात दगावले असल्याचीही प्राथमिक माहिती समोर येत आहे.

घटनेची माहिती मिळताच जखमींना बार्शीतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहे. तर गंभीर म्हणजे बसचालक दारू पिऊन गाडी चालवत होता आणि त्यामुळेच बसचा अपघात झाला असल्याचं सांगण्य़ात येत आहे.

अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. त्यांनी मृतांचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. तर पोलीस या अपघाताचा कसून तपास करत आहे.

दरम्यान, चालकाच्या चुकीमुळे तीन चिमुरड्यांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. तर यात बस चालकाला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी मृतांच्या कुटुंबियांकडून करण्यात आली आहे.

मृतांची नावे

1)आर्वी मोहन देवकते, वय - दीड वर्ष

( रा.विदंगी खुर्द ता.अहमदपुर जि लातुर)

2)फैज इस्माईल पठाण, वय - तीन वर्ष (रा.दामुननगर आदिवली मुंबई)

3)धनश्री ज्ञानेश्वर मुकनर, वय - 12 वर्ष रा.हिप्परगा(शहा) ता.कंदार जि.नांदेड

VIDEO : भररस्त्यावर महिला पोलीस विरुद्ध वाहतूक पोलीस राडा,कारण...

First published: November 18, 2018, 11:43 AM IST

ताज्या बातम्या