पुणे, 15 एप्रिल : पुण्याहून औरंगाबादच्या दिशेने जाणा-या शिवशाही बसला रांजणगाव गणपती येथे भीषण अपघात झाला. अपघातात 15 प्रवाशांसह बस चालक गंभीर जखमी झाला आहे. सर्व जखमींना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. रविवारी (14 एप्रिल) रात्रीच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातावेळी बसमध्ये एकूण 41 प्रवासी प्रवास करत होते.
चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचं बोललं जात आहे. स्थानिक नागरिकांच्या मदतीने प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी जखमींना हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. एसटी महामंडळाच्या माध्यमातून प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी वातानुकूलित सुविधा असणारी शिवशाही रस्त्यावर उतरविली आहे. मात्र, आता हीच शिवशाही अनेक प्रवाशांच्या जिवावर एक संकट घेऊन येत असल्याचे चित्र दिसत आहे. दिवसेंदिवस शिवशाही बसच्या अपघातांमध्ये वाढ होत असल्याचं दिसत आहे.
वाचा अन्य बातम्या
मुरली मनोहर जोशींचे अडवाणींना पत्र, काय आहे सत्य?
VIDEO: उर्मिला मातोंडकरांच्या प्रचार सभेत 'मोदी-मोदी'च्या घोषणा, युवकांना मारहाण
मी मेल्यानंतर तुम्हाला समाधान मिळणार का? असं का म्हणाल्या जयाप्रदा पाहा VIDEO
VIDEO: नाशिक-मुंबई महामार्गावर बिबट्याची शतपावली
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Shirur