मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

मोठी बातमी, पार्थ पवार पुन्हा निवडणूक लढवणार, पंढरपुरातून मिळणार उमेदवारी?

मोठी बातमी, पार्थ पवार पुन्हा निवडणूक लढवणार, पंढरपुरातून मिळणार उमेदवारी?

राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार भारत भालके यांचं निधन झाले आहे. त्यांच्या निधनानंतर पंढरपूरमध्ये रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक होणार आहे.

राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार भारत भालके यांचं निधन झाले आहे. त्यांच्या निधनानंतर पंढरपूरमध्ये रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक होणार आहे.

राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार भारत भालके यांचं निधन झाले आहे. त्यांच्या निधनानंतर पंढरपूरमध्ये रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक होणार आहे.

    पंढरपूर, 27 डिसेंबर : राष्ट्रवादीचे (NCP) नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) यांचे सुपुत्र पार्थ पवार (Parth pawar) पुन्हा एकदा निवडणुकीसाठी उभे राहण्याच्या तयारीत असल्याची चर्चा रंगली आहे. पंढरपूरमध्ये पोटनिवडणुकीमध्ये पार्थ पवार यांना उमेदवारी देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार भारत भालके यांचं निधन झाले आहे. त्यांच्या निधनानंतर पंढरपूरमध्ये रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी पार्थ पवार यांना उमेदवारी देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पार्थ पवार यांना जर उमेदवारी दिली तर पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचा विजय हा आणखी सोपा होईल असा विश्वास राष्ट्रवादीच्या नेत्यांनी व्यक्त केला आहे.  त्यांचा विजय हा निश्चित मानला जात आहे. WhatsApp OTP स्कॅम; अशा पद्धतीने हॅक केले जातात अकाउंट्स, अशी घ्या काळजी तसंच पार्थ पवार यांना जर उमेदवारी देण्यात आली तर प्रशांत पारिचारक पार्थ यांना पाठिंबा देण्यासाठी रिंगणात उतरणार असल्याचे बोलले जात आहे. भारत भालके यांचे सुपुत्र भगिरथ भालके यांची नुकतीच  पंढरपूरच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी निवड केली आहे.  भगिरथ भालके यांना पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी देण्यात आली असती, तर लोकांच्या सहानुभुतीचा फायदा त्यांना झाला असता. पण, पोटनिवडणुकीऐवजी पुढील  निवडणुकीत भगिरथ भालके यांना उमेदवारी देण्याचे आश्वासन राष्ट्रवादीकडून दिले असल्याचे बोलले जात आहे. Coronavirus पेक्षा गंभीर समस्यांना तयार राहा, WHO च्या प्रमुखांचा इशारा! भारत भालके यांचा लोकसंपर्क मोठा होता. जनतेतून निवडून आलेले ते नेते आहे.  त्यांच्या अकाली निधनामुळे पंढरपुरात जागा रिक्त झाली असून त्यांच्या जागी कुणाची निवड होणार अशी चर्चा रंगली होती. शरद पवार यांनी पंढरपूरमध्ये येऊन हा संभ्रम दूर केला होता. भगिरथ भालके यांचं वय आणि अनुभव नसल्यामुळे पोटनिवडणुकीत उमेदवारी देण्यास तुर्तास टाळले आहे. प्रशांत पारिचारक गट गेल्या अनेक वर्षांपासून पंढरपुरात सक्रिय आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या एका तरुण नेत्याने पार्थ पवार यांच्या नावाची पोटनिवडणुकीच्या उमेदवारीसाठी मागणी केली आहे, असं वृत्त एबीपी माझा वृत्तवाहिनीने दिले आहे. तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांनीही पंढरपुरचा दौरा केला होता. भारत भालके यांचं निधन झाल्यामुळे त्यांच्या विरोधात उमेदवार उभा करण्याची कोणतीही रणनीती नाही, असं फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे पार्थ पवार यांना राष्ट्रवादी उमेदवारी देत की नाही हे आता पाहण्याचे ठरणार आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या