रोहित यांचं आजोबांना आवाहन, पार्थ पवारांनीही दिली पहिली प्रतिक्रिया

पार्थ पवारांनी रोहित यांच्या सुरात सूर मिसळवत मतभेदाच्या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे.

News18 Lokmat | Updated On: Mar 13, 2019 08:36 AM IST

रोहित यांचं आजोबांना आवाहन, पार्थ पवारांनीही दिली पहिली प्रतिक्रिया

पुणे, 13 मार्च : माढा लोकसभा मतदारसंघातून लढण्याची घोषणा करणाऱ्या पवारांनी आता आपली भूमिका बदलत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही, असं म्हटलं. 'साहेबांनी आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करावा,' असं आवाहन त्यानंतर शरद पवार यांचे नातू आणि जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार यांनी केलं होतं. त्यावर आता अजित पवार यांचे सुपुत्र आणि रोहित यांचे भाऊ पार्थ पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

'रोहित दादा जे बोलला ते बरोबर आहे. मी त्याच्या सोबत आहे,' असं म्हणत पार्थ पवारांनीही रोहित यांच्याच सुरात सूर मिसळले आहेत. पार्थ पवारांची मावळमधून लढण्याची इच्छा हे शरद पवार यांनी निवडणुकीत माघार घेण्यामागील कारण आहे, असं बोललं जात होतं. त्यानंतर रोहित पवार यांनी आजोबा शरद पवार यांना निवडणूक लढवण्याचं केलेलं आवाहन म्हणजे पवार घराण्यातील संघर्ष आहे, अशाही चर्चा रंगू लागल्या होत्या. पण पार्थ पवारांनी रोहित यांच्या सुरात सूर मिसळवत या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे.

काय होती रोहित पवार यांची फेसबुक पोस्ट?

"राजकारणातले मोठमोठ्ठे लोक साहेबांच्या राजकारणाचा गौरव करत असताना काय म्हणतात हे आपणाला माहितच आहे पण सर्वसामान्य लोकं काय म्हणतात याकडे पवार साहेब नेहमीच लक्ष देतात. म्हणूनच गेली 52 वर्ष फक्त राजकारणच नाही तर समाजकारणात देखील हिच एकमेव व्यक्ती आमच्यासाठी उभा राहू शकते अस सर्वसामान्य माणसांच मत आहे.

महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या सहवासातून सुरू झालेला साहेबांचा हा प्रवास भेदभावाच, जातीधर्माचं राजकारण न करता, गेली 52 वर्ष न थकता सर्वसामान्यांसाठी सुरू आहे, म्हणूनच पवार साहेबांच राजकारण कोणत्या हवेवर नाही तर सर्वसामान्यांच्या घरातून चालू होतं. हे मला स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीच्या दिवशीच अभिमानाने सांगू वाटतं.

Loading...

एक कार्यकर्ता म्हणून,

“साहेबांच्या प्रत्येक निर्णयाचा आदर हा असणारच आहे, पण या आदरच्या पुढे प्रेम असतं. आणि माझं आणि माझ्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांच प्रेम म्हणून आमच्या प्रत्येकाच हेच मत आहे की, साहेब आपण आपल्या निर्णयाचा पुर्नविचार करा.”

बाकी राहता राहिला हवेतून पदावर बसलेल्या लोकांचा विषय तर साहेबांबद्दलच आपलं वक्तव्य हे शेवटच असू द्या, तसही बेडकासारखं हवा भरून बैल होण्याच्या नादात आपण फुटणार होताच. पण अशी वक्तव्य करत राहिलात तर हवा भरण्याच्या आतच फुटाल."


SPECIAL REPORT : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पवार कुटुंबात घमासान


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 13, 2019 08:36 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...