मतमोजणी केंद्राभोवती जॅमर बसवा, धनंजय मुंडेंची निवडणूक आयोगाकडे मागणी

मतमोजणी केंद्राभोवती जॅमर बसवा, धनंजय मुंडेंची निवडणूक आयोगाकडे मागणी

मागील काही निवडणुकांपासून देशात ई.व्ही.एम. मशिन हॅकिंगचा आरोप करण्यात येत आहे.

  • Share this:

बीड, 18 ऑक्टोबर : 'विधानसभा निवडणुकीच्या मतपेट्या ठेवलेल्या स्ट्राँग रूम आणि मतमोजणी केंद्राभोवती जॅमर बसवावा. तसंच मतदान ते मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत या परिसरातील मोबाईल टॉवरही बंद ठेवावेत,' अशी मागणी परळीतील राष्ट्रवादीचे उमेदवार आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. 

मागील काही निवडणुकांपासून देशात ई.व्ही.एम. मशिन हॅकिंगचा आरोप करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांनी केलेल्या या मागणीला महत्व प्राप्त झाले आहे. मतदानासाठी वापरण्यात येणार्‍या मतदान यंत्राशी मोबाईल टॉवर्स आणि वायफायच्या माध्यमातून छेडछाड होण्याची भिती असून निवडणूक प्रक्रियेची निष्पक्षता कायम राहावी, या दृष्टीने आयोगाने सुरक्षात्मक उपाययोजना करण्याची गरज असल्याचे मुंडे यांनी म्हटले आहे. 

सुरक्षेचा उपाय म्हणून मतदान यंत्र ठेवलेल्या स्ट्राँगरूममध्ये व मतमोजणीसाठी निश्चित करण्यात आलेल्या मतमोजणी केंद्रात जॅमर बसवण्यात यावेत. तसंच या दोन्ही जागांच्या परिसरातील मोबाईल टॉवर यंत्रणा दि.21 ऑक्टोबर ते दि.24 ऑक्टोबर पर्यंत बंद करण्यात यावेत, अशी विनंती त्यांनी केंद्रीय निवडणूक आयोग, राज्य निवडणूक आयोग, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी, परळी विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

परळीत अटीतटीची लढत

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत अनेक मतदारसंघात चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. काही मतदारसंघातील हायहोल्टेज सामन्याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. बीड जिल्ह्यातील परळी मतदारसंघातही मोठं घमासान पाहायला मिळत आहे. कारण या मतदारसंघात भाजपच्या नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादीचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यात रंगतदार सामना पाहायला मिळत आहे.

2 तासांपासून प्रफुल पटेल यांची चौकशी, पाहा ईडी कार्यालयातून GROUND REPORT

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 18, 2019 03:18 PM IST

ताज्या बातम्या