Home /News /maharashtra /

सोसायटीत पार्किंगचा वाद, गावगुंडांनी हॉकी स्टिकने केली मारहाण, घटनेचा LIVE VIDEO

सोसायटीत पार्किंगचा वाद, गावगुंडांनी हॉकी स्टिकने केली मारहाण, घटनेचा LIVE VIDEO

सोसायटीमध्ये वाहन पार्किंगवरून सातत्याने वाद निर्माण करणाऱ्या दोघा गावगुंडांनी त्याच सोसायटीत राहणाऱ्या लक्ष्मीकांत वाघमारे यांना हॉकी स्टिकने बेदम मारहाण केली

    प्रमोद पाटील, प्रतिनिधी पनवेल, 28 मे :  सोसायटीमध्ये वाहन पार्किंगच्या वादातून (Parking dispute in society ) दोन गावगुंडांनी एका तरुणावर हॉकी स्टिकच्या (hockey sticks ) साहाय्याने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना पनवेलमधील (panvel) खांदेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपी फरार आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खांदेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील अंबिका नगर या सोसायटीमध्ये ही घटना घडली आहे.  या सोसायटीमध्ये वाहन पार्किंगवरून सातत्याने वाद निर्माण करणाऱ्या दोघा गावगुंडांनी त्याच सोसायटीत राहणाऱ्या लक्ष्मीकांत वाघमारे यांना हॉकी स्टिकने बेदम मारहाण केली. हा  प्रकार मंगळवारी रात्रीच्या सुमारास घडला. यावेळी लक्ष्मीकांत वाघमारे यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले होते. पण या गावगुंडांनी स्वतःला मारहाण झाल्याची तक्रार देण्यासाठी खांदेश्वर पोलीस ठाणे गाठले. या प्रकरणात जखमी लक्ष्मीकांत वाघमारे यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांच्या पत्नीने खांदेश्वर पोलीस ठाण्यात जाऊन प्रकरणाची तक्रार दिली. यावेळी खांदेश्वर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष कोकाटे यांनी याची दाखल घेतली. मात्र जखमीचा वैद्यकीय प्रमाणपत्र मिळेपर्यंत गुन्हे नोंद करणे राहिले होते. गंभीररीत्या जखमी झालेल्या पीडित वाघमारे यांच्या चेहऱ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून सदरची जखम ही हॉकी स्टिकने मारहाण झाल्यामुळे झाली असून हा जीवघेणा हल्ला असल्याचा लेखी दाखला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला. त्यानंतर पोलिसांनी या घटनेकडे गांभिर्याने लक्ष देत 323,324 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, जखमी लक्ष्मीकांत वाघमारे यांच्या चेहऱ्यामध्ये २ स्टीलच्या प्लेट्स बसविण्यात आल्या असून आजही येथील गावगुंड हे आमच्या पाठीमागे फिरून आम्हाला त्रास देत आहे, आमच्या जीवाला धोका असल्याचेही पोलिसांना सांगितले. या प्रकरणातील दोन्ही आरोपी फरार असून खांदेश्वर पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या