शाळांच्या मनमानी विरोधात पालकांचं उपोषण अस्त्र

शाळांच्या मनमानी विरोधात पालकांचं उपोषण अस्त्र

पुण्यातील पालक नियमबाह्य फीवाढ,पुस्तकं,गणवेश खरेदीची सक्ती या विरोधात मनमानी करणाऱ्या शाळांविरोधात प्रशासन काहीच ठोस कारवाई करत नसल्यानं अखेर उपोषणाला बसले आहेत.

  • Share this:

अद्वैत मेहता,पुणे

09 मे : पुण्यातील पालक नियमबाह्य फीवाढ,पुस्तकं,गणवेश खरेदीची सक्ती या विरोधात मनमानी करणाऱ्या शाळांविरोधात प्रशासन काहीच ठोस कारवाई करत नसल्यानं अखेर उपोषणाला बसले आहेत.

शिक्षण उपसंचालक दिनकर टेमकर यांना घेराव घालून पुण्यातील पालकांनी बेकायदेशीर,नियमबाह्य वागणाऱ्या शाळांविरोधात कारवाई करण्याची मागणी केली होती. टेमकर यांनी 15 दिवसांच्या मुदतीत कारवाई करण्याचं आश्वासन दिलं होतं. ही मुदत आज संपली. पालकांच्या शिष्ट मंडळाने नवीन नियुक्ती झालेल्या शिक्षण आयुक्त विपीन शर्मा यांच्याशी चर्चा केली.

केंद्रीय शिक्षणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी मनमानी करणाऱ्या सीबीएसई शाळांविरोधात सरकारने कडक कायदा करत असल्याचं सांगितलं होतं, राज्याचे शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनीही नियमानुसार विहित कालावधीत 15 टक्के पेक्षा जास्त फी वाढ करणाऱ्या शाळांविरोधात सरकार कारवाई करेल असं म्हटलं होतं.

पण मंत्र्यांची आश्वासन या भूलथापा आहेत. सरकार निष्क्रिय तर प्रशासन उदासीन आहे आणि यामुळे शाळा मुजोर झाल्या आहेत असा पालकांचा आरोप आहे.

दोषी शाळा प्रशासनाविरोधात फौजदारी खटले दाखल करा अशी मागणी करत विनोद तावडे यांच्या राजीनाम्याचीही मागणी संतप्त पालकांनी केली. शिक्षण आयुक्तांचं कार्यालय असलेल्या

मध्यवर्ती इमारती बाहेर पालकांनी बेमुदत उपोषण सुरू केलंय.

शिक्षणाच्या बाजारीकरणाविरोधातील पालकांचा आवाज मुख्यमंत्री फडणवीस यांनी ऐकावा अशी अपेक्षा या पालकांची आहे. विशेष म्हणजे शाळांची मनमानी फक्त पुण्यात नाही तर मुंबई,नागपूर,नाशिक,सोलापूर अशा अनेक शहरात सुरू आहे.

First published: May 9, 2017, 11:33 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading