शिवसेनेचा राष्ट्रवादीला दणका, उद्धव ठाकरेंनी निर्णय घेत परभणीतील वर्चस्वाला दिला धक्का

शिवसेनेचा राष्ट्रवादीला दणका, उद्धव ठाकरेंनी निर्णय घेत परभणीतील वर्चस्वाला दिला धक्का

शिवसेना खासदार संजय जाधव यांनी थेट पक्षप्रमुखांकडे खासदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला होता.

  • Share this:

मुंबई, 29 ऑगस्ट : परभणीतील स्थानिक राजकारणामुळे राष्ट्रवादी आणि शिवसेनेत संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण जिंतूर मार्केट कमिटीवरील प्रशासक मंडळाच्या नेमणुकीवरून नाराज झालेल्या शिवसेना खासदार संजय जाधव यांनी थेट पक्षप्रमुखांकडे खासदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आता या प्रशासक मंडळालाच स्थगिती दिली आहे.

मार्केट कमिटीवरील राष्ट्रवादीच्या वर्चस्वानंतर शिवसेना खासदारांनी नाराजी व्यक्त केल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिंतूर-मानवत बाजार समितीच्या अशासकीय प्रशासक मंडळाच्या नियुक्तीला तात्पुरती स्थगिती दिली आहे. शिवसेना नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या प्रस्तावावर निर्णय घेताना उद्धव ठाकरे यांनी हा स्थगिती आदेश दिला.

गंभीर आरोप करत राष्ट्रवादीचे स्थानिक नेते आक्रमक

'मागच्या सरकारच्या काळात जिंतूर मार्केट कमिटीवर भाजपचे प्रशासक मंडळ होते, त्यावेळी खासदार साहेबांना एखाद्या निष्ठावान शिवसैनिकाची आठवण झाली नाही. कारण स्पष्ट आहे, त्यांना कार्यकर्त्याचं नाव पुढं करून भाजपला मदत करायची आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने परभणी जिल्हा परिषदेत ज्या प्रमाणे आघाडीधर्म पाळला त्याचप्रमाणे खासदारांनी आघाडीधर्म पाळून मित्रपक्षाला विरोध करणे बंद करावे,' अशी आक्रमक भूमिका आता राष्ट्रवादीचे आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी घेतली आहे.

खासदारांनी मांडलेली एकतर्फी बाजू ऐकून आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिंतूर व मानवत मार्केट कमिटीच्या प्रशासक मंडळाला स्थगिती दिली. आम्ही आमच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि इतर वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करणार आहोत. मला विश्वास आहे की यासंदर्भात योग्य निर्णय घेण्यात येईल,' असं आमदार दुर्राणी यांनी म्हटलं आहे.

Published by: Akshay Shitole
First published: August 29, 2020, 5:13 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading