• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: किरकोळ वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; तरुणांकडून दगडफेक आणि जाळपोळ
  • VIDEO: किरकोळ वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; तरुणांकडून दगडफेक आणि जाळपोळ

    News18 Lokmat | Published On: Jul 18, 2019 10:28 AM IST | Updated On: Jul 18, 2019 10:28 AM IST

    परभणी, 18 जुलै: परभणी जिल्ह्यातील पालम शहरामध्ये, दोन गटात किरकोळ वादातून झालेल्या हाणामारीने, जाळपोळीचे रूप घेतला असून, शहरातील काही भागांमध्ये दगडफेकीच्या घटना घडल्या आहेत. बुधवारी संध्याकाळच्या सुमारास, शहरातील मुख्य चौकांमध्ये, दोन गट समोरासमोर आले. किरकोळ वादातून दोन गटांमध्ये वाद झाला आणि त्याचं रुपांतर पुढे हाणामारी-जाळपोळीत झालं. काही युवकांनी दगडफेकही केली. त्यानंतर शहरातील बाजारपेठ पूर्णपणे बंद करण्यात आली. प्रकार वाढत जाऊन रस्त्यावर उभ्या असलेल्या, काही दुचाकीनही या जमावानं लक्ष केले. या घटनेमध्ये रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या, जवळपास दोन ते तीन मोटरसायकल पेटवून देण्यात आल्या. त्यानंतर मोठ्या प्रमाणात पोलीस कुमक पालम शहरामध्ये मागवण्यात आल्या असून सध्या परिस्थिती तणावपूर्ण शांतता आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading