• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • VIDEO: अंत्यसंस्कार करण्यासाठी पार करावी लागते नदी, रस्त्यांच्या दुरावस्थेचं भीषण वास्तव

VIDEO: अंत्यसंस्कार करण्यासाठी पार करावी लागते नदी, रस्त्यांच्या दुरावस्थेचं भीषण वास्तव

चारठाणा याठिकाणी मृत व्यक्तीवर अंत्यसंस्कार करण्यासाठी नदीमधून प्रेताला घेऊन जाण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. जिंतूर तालुक्यातील चारठाणा या गावातील ही घटना आहे.

  • Share this:
परभणी, 28 ऑगस्ट: राज्यभरात अनेक शहरं अशी आहेत की जिथे चांगल्या रस्त्यांची वानवा आहे. ग्रामीण भाग तर या सुविधेपासून कित्येक मैल दूर आहे. अनेक ग्रामीण भागात सुरक्षित आणि चांगले रस्ते बनलेच नाही आहे. परभणी जिल्ह्यातील ग्रामीण भागातही असंच चित्र पाहायला मिळते आहे. याठिकाणी रस्त्यांच्या दुरावस्थेचं एक विदारक चित्र पुन्हा एकदा समोर आलं आहे. परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यात चारठाणा नावाचं गाव आहे. याठिकाणी एका मृत व्यक्तीवर अंत्यसंस्कार करण्याासठी गावकऱ्यांना स्वत:चा जीव धोक्यात घालण्याची वेळ आली आहे. या घटनेचा धक्कादायक व्हिडीओ News18 लोकमतच्या हाती लागला आहे. चारठाणा याठिकाणी मृत व्यक्तीवर अंत्यसंस्कार करण्यासाठी नदीमधून प्रेताला घेऊन जाण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. जिंतूर तालुक्यातील चारठाणा या गावातील ही घटना आहे. या गावात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याला नदीच्या पलीकडे नेऊन अंत्यसंस्कार करावे लागतात. पावसात अशी एखादी दुर्दैवी घटना घडली तर या गावकऱ्यांनाच जीव धोक्यात घालून हे विधी करावे लागतात. हे वाचा-तुमच्या सोबत Online Fraud झालाय? बँक या परिस्थितीत देईल नुकसान भरपाई पावसाळ्यात पाणी भरलेल्या नदी मधूनच प्रेताला घेऊन जाण्याची वेळ नागरिकांवर येते. याविषयी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी कडे वारंवार विनंती करूनही मागील अनेक वर्षांपासून यामध्ये कोणताही बदल झालेला नाही. याठिकाणी योग्य मार्ग करण्याची मागणी केली जात आहे. या अगोदरही परभणी जिल्ह्यातील रस्त्यांच्या दुरवस्थेचं चित्र, न्यूज18 लोकमत ने वारंवार दाखवले होते. परंतु त्यामध्ये कोणताही बदल झाला नसल्याचं या घटने वरून स्पष्ट होत आहे. पाहा व्हिडीओ या अगोदरही परभणी जिल्ह्यात असाच एक प्रकार, पालम तालुक्यामध्ये घडला होता. मृत महिलेचे शवविच्छेदन करण्यासाठी आणि त्यानंतर तिचा मृतदेह गावात परत आणून अंत्यसंस्कार करण्यासाठी गावकऱ्यांना चिखलातून रस्ता काढावा लागला होता. जिल्ह्यातील ग्रामीण रस्त्यांची दुरावस्थेच हे विदारक चित्र आहे
Published by:Janhavi Bhatkar
First published: