Home /News /maharashtra /

तरुणाची निर्घृण हत्या, परभणीत नवविवाहित वधू-वराकडून निषेध, लग्नानंतर थेट रस्त्यावर

तरुणाची निर्घृण हत्या, परभणीत नवविवाहित वधू-वराकडून निषेध, लग्नानंतर थेट रस्त्यावर

परभणीत नवरदेव-नवरी लग्न लागल्यानंतर थेट रस्त्यावर उतरली.

    परभणीत, 26 मे : लग्नाच्या दिवशी नवरदेव-नवरी प्रचंड आनंदात असतात. सर्व नातेवाईक त्यांच्या भेटीगाठी घेतात. त्यांच्या आयुष्यातील तो दिवस खूप मोठा मानला जातो. पण परभणीत एक वेगळी घटना समोर आली आहे. औरंगाबादमध्ये काही दिवसांपूर्वी चार ते पाच जणांनी मिळून एका तरुणाची निर्घृणपणे हत्या केली होती. या हत्येच्या निषेधार्त नवरदेव-नवरी लग्न लागल्यानंतर थेट रस्त्यावर उतरली. या नवरदेव-नवरीने हत्येच्या घटनेचा निषेध करत आंदोलन केलं. नवरदेव नवरीच्या या आंदोलनाची संपूर्ण परभणीत चर्चा आहे. लहुजी शक्ती सेनेच्या वतीने परभणी जिल्ह्यातील गंगाखेड शहरात महाराणा प्रताप सिंग चौकात रास्ता रोका आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात नवदाम्पत्य सहभागी झालं. यावेळी हे नवदाम्पत्य वधू-वाराच्या वेशातच होते. त्यामुळे रस्त्याने ये-जा करणाऱ्या अनेक नागरिकांचं या दाम्पत्याकडे लक्ष वेधलं. दरम्यान, लहुजी शक्ती संघटनेचे अध्यक्ष विष्णू कसबे यांच्या नेतृत्वाखाली हे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. (सकाळी ठाकरे, संध्याकाळी पवारांना मोठा दणका; अविनाश भोसले यांना CBI कडून अटक) नेमकी घटना काय? औरंगाबादमध्ये काही दिवसांपूर्वी चार ते पाच जणांनी मिळून एका तरुणाची निर्घृणपणे हत्या केली होती. या तरुणाचं मनोज आव्हाड असं नाव होतं. मृतक तरुण हा एका माजी नगरसेवकाच्या लॉनवर कामाला होता. त्याची चार ते पाच जणांनी मिळून रात्रीच्यावेळी लाथा-बुक्क्याने मारहाण करुन हत्या केली होती. विशेष म्हणजे आरोपींनी मारहाण करताना मोबाईलमध्ये व्हिडीओ तयार केला होता. तो व्हिडीओ सोशल मीडियावर देखील व्हायरल करण्यात आला होता. संबंधित व्हिडीओ समोर आल्यानंतर खळबळ उडाली आहे. आरोपींना मनोज आव्हाडला इतकी मारहाण केली की त्यात त्याचा मृत्यू झाला. या हत्येप्रकरणी मनोजला न्याय मिळावा यासाठी अनेक सामाजिक संघटना आंदोलन करत आहेत.
    Published by:Chetan Patil
    First published:

    पुढील बातम्या