परभणीत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष, सत्तेसाठी राष्ट्रवादी लागणार मदत

परभणीत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष, सत्तेसाठी राष्ट्रवादी लागणार मदत

सर्वाधिक 30 जागा जिंकून काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरलाय. तर राष्ट्रवादीचं पानिपत झालं असून 30 जागावरून 12 जागांवर समाधान मानावं लागलं.

  • Share this:

21 एप्रिल : परभणी महापालिका निवडणुकीचे निकाल जवळपास  स्पष्ट झाला असून काँग्रेसने मुसंडी मारत बहुमताच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलीये. सर्वाधिक 29 जागा जिंकून काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरलाय. तर राष्ट्रवादीला हादरा बसला असून 30 जागावरून 20 जागांवर समाधान मानावं लागलं.

परभणी महापालिका निवडणुकीत  ६५ जागांसाठी ४१८ उमेदवार रिंगणात होते. परभणी आतापर्यंत राष्ट्रवादीचं वर्चस्व कायम राहिलं. 10 महापालिकांमध्ये राष्ट्रवादीला पुणे, पिंपरी-चिंचवड गमवावी लागली. त्यामुळे परभणी राष्ट्रवादीची प्रतिष्ठापणाला लागली होती. इथं फक्त शिवसेनेचं राष्ट्रवादीला आव्हान होतं. त्यामुळे राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना असं चित्र रंगलं होतं. पण, यात काँग्रेसने बाजी मारता सर्वाधिक जागा जिंकल्यात. काँग्रेस 30 जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरलाय. तर राष्ट्रवादीला  20 जागावर समाधान मानावे लागले.

मागील निवडणुकीत राष्ट्रवादीच्या वाट्याला 30 जागा मिळाल्या होत्या. तर शिवसेनेला 8 जागांवर समाधान मानावं लागलं.  पण, काँग्रेसला बहुमताचा जादुई 33 जागांचा आकडा थोडक्यात हुकलाय. त्यामुळे परभणीत काँग्रेस राष्ट्रवादीची मदत घेऊन सत्ता स्थापन करण्याचा सोप पर्याय निर्माण झालाय.

परभणीमध्ये काँग्रेसची ही कामगिरी अनपेक्षित अशीच आहे. कारण जिल्ह्यात काँग्रेसचा एकही आमदार नाहीय. परभणीमध्ये काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेसला चीतपट केले आहे. राष्ट्रवादीचे परभणीमध्ये तीन आमदार आहेत. परभणीतील पक्षाची ही कामगिरी काँग्रेस कार्यकर्त्यांचा उत्साह आणि आत्मविश्वास वाढवणारी आहे.

परभणी महानगरपालिकेचा निकाल : एकूण जागा- 65

काँग्रेस- 29

राष्ट्रवादी- 20

शिवसेना- 6

भाजप- 8

अपक्ष 2

मागील निवडणुकीचा निकाल 

    राष्ट्रवादी काँग्रेस- 30

    काँग्रेस- 23

    शिवसेना- 8

    भाजप- 2

    अपक्ष- 2

First Published: Apr 21, 2017 02:54 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading