पोलीस खात्यामध्ये काम करणाऱ्या तरुणीचा पतीकडून खून, स्वत:ही केली आत्महत्या

पोलीस खात्यामध्ये काम करणाऱ्या तरुणीचा पतीकडून खून, स्वत:ही केली आत्महत्या

रागातून झालेल्या एका घटनेमुळे चिमुकल्याला आता आयुष्यभरासाठी आई-वडिलांच्या प्रेमाला मुकावं लागणार आहे.

  • Share this:

परभणी, 14 मार्च : कोणावर कधी आणि कसली वेळ येईल हे सांगता येत नाही. डोळ्यासमोरच आई आणि वडिलांचा मृत्यू पाहण्याची दुर्दैवी वेळ अवघ्या दीड वर्षीय मुलावर ओढावली आहे. रागातून झालेल्या एका घटनेमुळे चिमुकल्याला आता आयुष्यभरासाठी आई-वडिलांच्या प्रेमाला मुकावं लागणार आहे.

धारदार शस्त्राने पत्नीची हत्या करून पतीने आत्महत्या केल्याची घटना परभणीमध्ये घडली आहे. शहरातील खानापूर फाटा परिसरात राहणाऱ्या 30 ते 35 वर्षीय युवकाने त्याच्या पत्नीची हत्या केली. तसंच त्यानंतर स्वतःचीही जीवनयात्रा संपवली आहे. या दाम्पत्याला एक ते दीड वर्षाचा मुलगा असून घडलेल्या प्रकारामुळे परिसरात खळबळ माजली आहे.

ओखानापूर फाटा परिसरात राहणाऱ्या कृष्णा माने या युवकाने पोलीस खात्यामध्ये काम करणाऱ्या कमल या त्याच्या पत्नीची हत्या केलीय आहे. दुपारी तीन वाजेच्या सुमारास पती-पत्नीमध्ये काही कारणावरून भांडण सुरू झालं. ज्याचा आवाज घराच्या बाहेरपर्यंत येत असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. हेच भांडण टोकाला गेल्याने हा प्रकार घडला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

हेही वाचा- धक्कादायक! प्रेयसीला खूश करण्यासाठी त्यानं 6 महिन्यांच्या चिमुकलीला जिवंत जाळलं

कृष्णा माने हा व्यवसायाने शेती करत होता. तर त्याची पत्नी पोलीस खात्यामध्ये कार्यरत होती. आज दुपारी काही कामानिमित्त आपल्या मुलाला सोबत घेऊन ते बाहेर गेले होते. पण त्यानंतर घरी आल्यावर,दोघा पती-पत्नीमध्ये वाद सुरू झाला. याचा आवाज बाहेरपर्यंत येत होता.

रागाच्या भरात कृष्णाने त्याच्या पत्नीची हत्या केली आणि स्वत:लाही संपवलं. हा भयानक प्रकार घडल्यानंतर याची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असून याचा तपास सुरू करण्यात आला आहे. परंतु या प्रकरणाबाबत पोलिसांनी अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.

First published: March 14, 2020, 6:48 PM IST

ताज्या बातम्या