मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Parbhani News : शिवसेना-काँग्रेसने एकत्र मारली बाजी, भाजप-राष्ट्रवादीचे गणित हुकले!

Parbhani News : शिवसेना-काँग्रेसने एकत्र मारली बाजी, भाजप-राष्ट्रवादीचे गणित हुकले!

प्रतिष्ठेच्या बनलेल्या परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये आज अखेर सुरेश वरपुडकर यांच्या गटाने बाजी मारली.

प्रतिष्ठेच्या बनलेल्या परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये आज अखेर सुरेश वरपुडकर यांच्या गटाने बाजी मारली.

प्रतिष्ठेच्या बनलेल्या परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये आज अखेर सुरेश वरपुडकर यांच्या गटाने बाजी मारली.

 परभणी, 06 एप्रिल : परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेचा निवडणुकीमध्ये (Parbhani District Central Bank Election) वरपूडकर गटाने (Suresh Warpudkar)बाजी मारली असून बँकेच्या अध्यक्षपदी काँग्रेसचे आमदार सुरेश वरपूडकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. तर शिवसेनेचे (Shivsena) राजेश पाटील गोरेगावकर यांची बँकेच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. भाजप (BJP) आणि राष्ट्रवादी (NCP) यांची मतांची बेरीज ऐनवेळी फिरल्याने भाजपचे नेते रामप्रसाद बोर्डीकर यांनी या निवडणुकीमधून लक्ष काढून घेतले होते. आणि त्यामुळे ही निवडणूक एकतर्फी झाली.

प्रतिष्ठेच्या बनलेल्या परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये आज अखेर सुरेश वरपुडकर यांच्या गटाने बाजी मारली. माजी आमदार आणि भाजपचे ज्येष्ठ नेते रामप्रसाद बोर्डीकर यांनी देखील या निवडणुकीमध्ये बँकेत सत्तास्थापनेसाठी प्रयत्न केले होते. त्यासाठी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांना सोबत घेत आकडेमोडीचे गणित साधायचा प्रयत्न केला. पण ऐन वेळी हे गणित जुळून न आल्याने त्यांनी निवडणुकीमधून लक्ष काढून घेतले.

राज्यात 3 दिवस इतकाच लसीकरणाचा साठा, राजेश टोपेंनी केंद्राकडे मागितली मदत

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या 21 जागांसाठी निवडणूक पार पडली होती. यामध्ये वरपुडकर गटाने दहा तर बोर्डीकर यांच्या गटाने 9 जागावर विजय मिळवला होता. तर दोन अपक्षांनीही या निवडणुकीमध्ये विजय मिळवला होता. विशेष म्हणजे, राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन उमेदवार, वरपूडकर यांच्या गटामधून तर दोन उमेदवार भाजपा नेते बोर्डीकर यांच्या गटामधून निवडून आले होते. पण आकडे मोडीच्या गणितामध्ये, चारही राष्ट्रवादीच्या सदस्यांना घेऊन राष्ट्रवादीचे आमदार बाबाजानी यांनी अध्यक्षपदाची मागणी करत, आपला वेगळा गट उभारण्याचे प्रयत्न केले.आणि त्यामुळे या निवडणुकीमध्ये चुरस निर्माण झाली होती.

IPL मध्ये सर्वाधिक विकेट घेणारे टॉप-5 बॉलर, 3 जण खेळले मुंबईकडून

पण ऐन वेळी मतांची आकडेवारी फिस्कटल्याने बाबाजानी यांना देखील, माघार घ्यावी लागली आणि त्यामुळे ही निवडणूक काहीशी, एकतर्फी झाली. आज अध्यक्षपदाच्या निवडीसाठी सर्व नवनिर्वाचित सदस्यांची बैठक बोलविण्यात आली होती. त्यामध्ये अध्यक्षपदासाठी काँग्रेस आमदार सुरेश वरपुडकर आणि  प्रेरणा वरपुडकर यांनी आपली उमेदवारी दाखल केली. तर उपाध्यक्षपदासाठी शिवसेनेचे राजेश पाटील गोरेगावकर, यांचा अर्ज आला होता. अर्ज भरण्याची वेळ संपल्यानंतर अर्ज छाननीमध्ये सर्व अर्ज वैध ठेवण्यात आले. त्यानंतर प्रेरणा वरपुडकर यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी एकमेव सुरेश वरपुडकर यांची उमेदवारी तर उपाध्यक्षपदासाठी राजेश पाटील गोरेगावकर यांचे उमेदवारी अर्ज राहिले. त्यांची निवड बिनविरोध जाहीर करण्यात आली. या निवडणुकीमध्ये, वरपूडकर आणि बोर्डीकर या दोन्ही गटांनी अखेरपर्यंत जोर लावला होता. परंतु, वरपूडकर यांनी बाजी मारत, जिल्हा मध्यवर्ती बँकेवर आपले वर्चस्व सिद्ध केले आहे आणि त्यामुळे येणाऱ्या काळात, जिल्ह्यातील राजकारणावर याचा काय परिणाम पडतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

First published:

Tags: Parbhani, Parbhani news