मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

आजोबा ठरला राक्षस, 7 वर्षीय नातवाचा धारदार विळ्याने वार करून खून

आजोबा ठरला राक्षस, 7 वर्षीय नातवाचा धारदार विळ्याने वार करून खून

 याप्रकरणी पोलिसांनी आरोपी दिगंबर जाधव याला अटक केली आहे.

याप्रकरणी पोलिसांनी आरोपी दिगंबर जाधव याला अटक केली आहे.

याप्रकरणी पोलिसांनी आरोपी दिगंबर जाधव याला अटक केली आहे.

परभणी, 12 ऑक्टोबर : निर्दयी आजोबांनी सात वर्षीय नातवाचा जीव घेतल्याची घटना परभणी जिल्ह्यात घडली आहे. धारधार विळ्याने पोटावर वार करून 52 वर्षीय आरोपीने आपल्या नातवाची हत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी दिगंबर जाधव याला अटक केली आहे. जिंतूर तालुक्यातील चिकलठाणा बुद्रुक येथे हा धक्कादायक प्रकार घडला.

अभिराज श्रीराम जाधव हा 7 वर्षीय चिमुकला आपल्या घरासमोर खेळत असताना त्याचे चुलत आजोबा दिगंबर जाधव याने अभिराज याचा गळा दाबून जीव घेण्याचा प्रयत्न केला. तसंच त्यानंतर हातातील विळ्याने त्याच्या पोटावर वार केले. निर्दयी आजोबांने नातवाला रक्ताच्या थारोळ्यात पाडलं.

आजूबाजूच्या लोकांना हा प्रकार लक्षात येताच अभिराजला सेलू येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु त्या ठिकाणी त्याने जीव सोडून दिला. घडलेल्या प्रकारामुळे गावांमध्ये दहशतीचं वातावरण असून, निर्दयी आजोबाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

आजोबानेच चिमुकल्या नातवाचा बळी का घेतला, यामागचं कारण अद्याप समजू शकले नाही. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असून पुढील तपास करण्यात येत आहे.

First published:

Tags: Parbhani news