म्हणूनच भारतात 'परभणी', सरपंचानं स्वखर्चानं गावात बांधली 100 शौचालयं !

म्हणूनच भारतात 'परभणी', सरपंचानं स्वखर्चानं गावात बांधली 100 शौचालयं !

परभणीच्या पूर्णा तालुक्यातील गौर हे ५००० लोकसंख्येचं गाव...६०० कुटुंबांचं हे गाव आज हागणदारी मुक्त गाव होतंय.

  • Share this:

पंकज क्षीरसागर, परभणी

12 डिसेंबर : आजही राज्यात ग्रामीण भागात कुठल्याही गावात प्रवेश करायचा तेव्हा नाकाला रुमाल बांधूनच करावा लागतो मात्र परभणीच्या पूर्णा तालुक्यातील हे गौर गाव मात्र त्याला अपवाद ठरलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वच्छ भारत अभियान खऱ्या अर्थाने या इथं राबवलं गेलंय काय ?, नेमकं याचं कारण पाहुयात या खास रिपोर्टमध्ये...

परभणीच्या पूर्णा तालुक्यातील गौर हे ५००० लोकसंख्येचं गाव...६०० कुटुंबांचं हे गाव आज हागणदारी मुक्त गाव होतंय. याचं कारण आहे या गावच्या महिला सरपंच चांगुणा पारवे...सरपंच झाल्या झाल्या पहिलं काम चांगुणा यांनी केलं ते शौचालयांचं...अनुदानाची वाट न पाहता पुढाकार घेऊन त्यांनी स्वखर्चानं गावात १०० शौचालयं बांधली. त्याशिवाय आणखी २५ शौचालयांचं काम सुरू आहे.

अनुदानासाठी वाट पाहत बसण्याऐवजी चांगुणा यांनी ही शौचालयं बांधल्यानं सगळ्यात मोठी सोय गावातल्या महिला, मुली आणि वृद्धांची झाली. प्रातर्विधीसाठी त्यांची पायपीटही थांबली आणि वेळही वाचला.

गावात शौचालय बांधून मग त्याचा फोटो काढून तो पाठवल्यानंतर मग अनुदान मिळतं. इतकी सगळी वाट पाहण्याऐवजी चांगुणा यांनी सूत्र हाती घेतली. त्याला गावकऱ्यांची साथ मिळाली. त्यामुळेच आता गावचं चित्र बदलतंय..

First published: December 12, 2017, 5:56 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading